धुळे-सुरत महामार्गावर ३१ लाखांचा दारुसाठा असलेला कंटेनर जप्त

एकास अटक : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नवापूर पोलीस पथकाची कारवाई
धुळे-सुरत महामार्गावर ३१ लाखांचा दारुसाठा असलेला कंटेनर जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

महाराष्ट्रातून गुजरात राज्यात अवैधरित्या (Illegally) दारुची वाहतूक (Liquor transport) करणारे कंटेनर(container) पोलीसांनी (police) जप्त केले असून त्यात ३१ लाख ५ हजार ३२० रुपये किमतीचा दारुसाठा (liquor store) आढळून आला आहे. याप्रकरणी चालकाला (driver)अटक (arrested) करण्यात आली असून विसरवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. धुळे-सुरत महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.

धुळे-सुरत महामार्गावर ३१ लाखांचा दारुसाठा असलेला कंटेनर जप्त
पारोळा बाजार समिती सभापती पदी डॉ. सतीश पाटील बिनविरोध

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१५ मे २०२३ रोजी धुळ्याकडून विसरवाडी, नवापूर मार्गे महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनरमधून अवैध दारुची चोरटी वाहतूक होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना मिळाली.

त्यांनी नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना पथक तयार करण्याचे आदेश दिले. पथकांनी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी हॉटेलजवळ सापळा रचला.

धुळे जिल्ह्याकडून येणार्‍या वाहनांची तपासणी करीत असतांना रात्री १० वाजेच्या सुमारास एक अशोक लेलँड कंपनीचा तपकिरी रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने येतांना दिसला, म्हणून पोलीस पथकातील अंमलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा देवून वाहन थांबविले.

प्रकाश नरसिंगराम देवासी (वय-२६ वर्षे, रा.गंगाणी ता.बावडी जि. जोधपूर राजस्थान) याने वाहनात मेडीको कंपनीचे औषधाचे खोके असून ते नगर येथून हिमा फार्मसीट्रीकल्स प्रा.लि. अंकलेश्वर, गुजरात येथे घेवून जात असल्याचे सांगितले.

धुळे-सुरत महामार्गावर ३१ लाखांचा दारुसाठा असलेला कंटेनर जप्त
मेहरगाव फाट्यावर अपघात : 21 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाचे बॉक्स व त्यामध्ये विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. म्हणून सदर वाहन विसरवाडी पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात

२३ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचे इंम्पेरियल ब्ल्यू ब्लेंडर गे्रन व्हीस्कीचे ६४८ खाकी रंगाचे खोके, त्यात १८० एम.एल.च्या एकुण ३१ हजार १०४ नग काचेच्या बाटल्या, ३ लाख ८८ हजार ८० रुपये किमतीचे रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रीमीयम व्हिस्कीचे ९८ खाकी रंगाचे खोके, त्यात ७५० एम.एल.च्या एकुण ११७६ नग काचेच्या बाटल्या,

धुळे-सुरत महामार्गावर ३१ लाखांचा दारुसाठा असलेला कंटेनर जप्त
VISUAL STORY : परिणीती चोप्राने केली नव्या आयुष्याची सुरूवात, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

३ लाख ७९ हजार ४४० रुपये किमतीचे रॉयल चॅलेंज फायनेस्ट व्हीस्कीचे ९३ खाकी रंगाचे खोके, त्यात १८० एम.एल.च्या एकुण ४ हजार ४६४ नग काचेच्या बाटल्या, ५ हजार रुपये किमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, झालानी मेडीकोचे ई-वे बील,

१५ लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर (क्रमांक केए ५१ बी-९९७४) असा एकुण ४६ लाख ०५ हजार ३२० रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी प्रकाश नरसिंगराम देवासी याने खोटे बनावट ई वे बिल,

टॅक्स इनव्हॉईस बनवून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून गुजरात राज्यात अवैध विदेशी दारु विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला म्हणून त्याच्याविरुध्द् विसरवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), १०८, सह भा.द.वि. कलम ४२०, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर,

पोलीस उपनिरीक्षक भुषण बैसाणेे, पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक युवराज परदेशी, पोलीस हवालदार पंकज पाटील, दिनेश वसुले, राजेश येलवे, पोलीस नाईक किशोर वळवी, योगेश थोरात, अतुल पानपाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र ठाकुर, विशाल नागरे, दादाभाई मासुळ, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र काटके, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com