समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचे काम बंद आंदोलन मागे

नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची यशस्वी मध्यस्थी
समुदाय आरोग्य अधिकार्‍यांचे काम बंद आंदोलन मागे

नंदुरबार | NANDURBAR प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषदेसमोर (Zilla Parishad) समुदाय आरोग्य अधिकार्‍यांनी (Community Health Officers) विविध मागण्यांसाठी आठ दिवसांपासुन कामबंद आंदोलन (Work stoppage movement) सुरू केले होते. दरम्यान, नवनिर्वाचित जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित (Z.P. President Dr. Supriya Gavit) व जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक ( Z.P. Deputy President Suhas Naik) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मागण्या मान्य (Promise to accept demands) करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हे आंदोलन मागे (Movement back) घेण्यात आले.

जिल्हा परिषदेसमोर समुदाय आरोग्य अधिकारी यांचे विविध मागण्यांसाठी आठ दिवसांपासुन रास्त व न्यायीक मागण्यांसाठी कामबंद व धरणे आंदोलन सुरू होते.

सदर आंदोलनाच्या मागण्या व अडचणी संदर्भात नवनिर्वाचित जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित व जि. प. उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील अधिकारी व नंदुरबार समुदाय अधिकारी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली.

त्यामध्ये सकारात्मक रित्या चर्चा झाली. त्यानुसार सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मागण्या योग्यवेळी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. डॉ.सुप्रिया गावित व सुहास नाईक यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने आठ दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी जि.प.अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, डॉ.हरीश कोकणी,

समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे पदाधिकारी डॉ. तुषार धामणे, डॉ. मनोज वळवी, डॉ तुषार वसावे, डॉ. सचिन नेरकर, डॉ संदीप काकुस्ते, डॉ .गौरव सोनवणे, डॉ. गुंतीलाल गावित, डॉ. जितेंद्र बिरार, पंकज मुंडे, डॉ. श्रद्धा नाईक, डॉ.सारिका गवळी,

डॉ. रुपाली इंदासराव आदी उपस्थित होते. आंदोलनास विविध संघटनांनी दिलेल्या पाठींब्याबाबत नंदुरबार जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेतर्फे आभार मानन्यात आले. काल आ.आमशा पाडवी व माजी आ.शरद गावित यांनीदेखील या समुदाय आरोग्य अधिकार्‍यांच्या आंदोलनस्थळी भेट देवून त्यांच्याशी चर्चा केली होती तसेच मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन दिले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com