कोल्ड स्टोअरेज आग : इन्शूरन्स कंपनीने 22 कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश

नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रारण निवारण आयोगाचा ऐतिहासिक निकाल
 कोल्ड स्टोअरेज आग : इन्शूरन्स कंपनीने 22 कोटी  नुकसान भरपाई देण्याचे आदेश

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

दोंडाईचा (dondaicha) येथील के.एस.कोल्ड स्टोअरेजला (KS Cold Storage) लागलेल्या आगप्रकरणी (case of fire) स्टोअरेज मालकाला (storage owner) न्यू इंडीया इन्शुरन्स कंपनीने (New India Insurance Company) 22 कोटी 59 लाख 39 हजार 745 रुपयांची नुकसान भरपाई (compensation) देण्याचे आदेश (damages order) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (District Consumer Grievance Redressal Commission) दिला आहे. याशिवाय तक्रारीचा खर्च व मानसिक त्रासापोटी 3 लाख रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय दिला आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 अन्वये सर्वात मोठया रकमेचा ऐतिहासीक न्याय निर्णय देण्यात आला आहे.

दोंडाईचा येथील के. एस. कोल्ड स्टोरेज वेअर हाऊसला दि. 2 सप्टेंबर 2019 रोजी आग लागली होती. या कोल्डस्टोअरेजच्या मालकांनी नुकसान भरपाईपोटी 25 कोटी मिळावेत यासाठी न्यु इंडिया इन्शुरन्स या कंपनीकडे दावा दाखल केला होता. मात्र, मानवी हस्तक्षेपामुळे कोल्ड स्टोअरेजला आग लागल्याचा ठपका ठेवत विमा कंपनीने दावा नाकारला होता. त्यानंतर कोल्ड स्टोअरेजच्या मालकाने नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

सदर प्रकरणाचे कामकाज आयोगाचे अध्यक्ष संजय पी. बोरवाल, सदस्या श्रीमती भारती पी.केतकर आणि सदस्य मोहन बोडस यांच्या समक्ष चालले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादाअंती आगीच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने भरपाई म्हणून 22 कोटी 59 लाख 39 हजार 745 रुपये नुकसान भरपाईचे देण्याचे आदेश न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला.

एवढेच नव्हे तर, मानसिक शारीरिक त्रास तसेच तक्रार अर्जाचा खर्च 3 लाख रुपये वेगळे द्यावे असेही निकालपत्रात म्हटले आहे.

तक्रारदारांच्या वतीने अ‍ॅड. रुपचंदानी यांनी कामकाज पाहिले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com