महापुरुषांच्या स्मारकातून नागरिकांनी प्रेरणा घ्यावीः आ.जयकुमार रावल

शहादा येथे महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे लोकार्पण
महापुरुषांच्या स्मारकातून नागरिकांनी प्रेरणा घ्यावीः आ.जयकुमार रावल

शहादा | ता.प्र.- SHAHADA

आपल्या स्वाभिमानाला, आपल्या विचारांना तडा जाऊ दिला नाही असे राजे महाराजे होऊन गेलेत. समाजाच्या उद्धारासाठी (Salvation of society) अनेक महापुरुषांनी प्रयत्न केलेत. त्यांचे महान कार्य त्यांच्या विचारातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. महापुरुषांचे (great men) स्मारक प्रेरणादायी (Memorial inspiring) असते. उभारलेल्या स्मारकातून त्यांचे आचार विचार व प्रेरणा नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन आ.जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal) यांनी केले.

येथील जुना मोहिदा रस्त्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळ महाराणा प्रतापसिंह यांच्या तैलचित्राचे अनावरण आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील अध्यक्षस्थानी होते.

सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे,महावीरसिंह रावल, देवेंद्रसिंह रावल, अरुण चौधरी, श्यामभाऊ चौधरी, प्रा.मकरंद पाटील, सुरेश नाईक, बापूजी जगदेव, रविंद्र राऊळ, रविंद्र जमादार, प्रा.संजय जाधव, अरविंद कुवर, सुपडू खेडकर, ऍड. स्वर्णसिंह गिरासे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे

यावेळी प्रवासादरम्यान आलेल्या खड्डयांच्या अनुभवाचे कथन माजी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. ते म्हणाले, प्रवासादरम्यान रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता समजत नव्हते. विद्यमान पालकमंत्री जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी विकास कामांच्या निधीबरोबर रस्त्याकडेही लक्ष द्यावे, असा खोचक टोला लगावला.

आपण पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या विकासात कधीही खिळ बसू दिला नाही. वेळोवेळी प्रत्येक भागाला निधी दिला. यावेळी कोमलसिंग गिरासे, अभिजीत पाटील, दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजपूत समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा.संजय राजपूत यांनी केले. यावेळी कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा सन्मानपत्र, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

शोभायात्रा अकर्षक

कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातील सप्तशृंगी मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शहरातील शेठ व्ही.के.शहा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला ऐतिहासिक देखावा व विद्यार्थ्यांनी केलेले नृत्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. निकेश राजपूत व सहकार्‍यांनी नृत्याचे संयोजन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com