नवापूर नगरपरिषद हद्दीतील नागरीक भोगताय मरणयातना

पालिकेची बघ्याची भूमिका, खाकरफळी भागात सोशल मीडियावरून होतोय निषेध
नवापूर नगरपरिषद हद्दीतील नागरीक भोगताय मरणयातना

नवापूर । Nawapur । श.प्र.

नवापूर नगर परिषद (Municipal Council )हद्दीतील खाकरफळी भागातील नागरिकांना (Citizens )दिवस रात्र मरणयातना (suffering death) मिळत आहे.

खाकरफळी भागातील नागरिकमोल मजुरी करून आपली उपजीविका भागवत आहे. येथील नागरिकांना जीवनवश्यक वस्तू किंवा आरोग्य सेवेसाठी रेल्वे पुलाच्या खालून बोगद्यातून ये जा करण्यासाठी रस्ता करण्यात आला आहे. अनेक वर्षा पासून पावसाळा आला की येथील नागरिकांना तारेवरची कसरत करत या पुला खालून प्रवास करावा लागतो संततधार पावसा मुळे येथील पुलाच्या खाली पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होते.

त्यामुळे नागरिकांचा शहराशी संपर्क खंडित होतो आणि हे नागरिक जवळच असलेल्या रेल्वे गेटचा वापर करत कसा बसा आपला पायी असो की वाहनाद्वारे प्रवास करून काम भागवत होते. परंतु गेल्या आठ दहा दिवसा पासून ह्या रेल्वे गेटच्या हद्दीत फेवरब्लॉक व काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून एकवीस तारखे पर्यंत काम सुरू राहणार असल्याने हे गेट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रेल्वे गेट बंद असल्याने आठ ते दहा दिवसा पासून उच्छल व खाकरफळी भागातील नागरिकांचे हाल होताना दिसत आहे.

नवापूर तालुक्यात संततधार पावसा मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आपल्याला सर्वश्रुत आहे परन्तु खाकरफळी भागातील नागरिकांना शहरात येण्या जाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर चा फेरा घेत आपला प्रवास करावा लागत आहे.

ह्या पुला खालून वाहणारे पाणी हे वनविभागाच्या नर्सरी असलेल्या मागील भागातून मोठ्या प्रमाणात येत असल्याने ह्या पुलाच्या खाली पुरसदृश्य परीस्थित आहे तरीही नागरिक आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या जीवघेण्या रस्ताचा वापर करतांना दिसत आहे. नगर परिषद आणि रेल्वे प्रशासना कडून ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

अनेक दिवसापासून संततधार पावसाने येथील नागरिकांच्या चिंतेत भर घातली असून रात्री बे रात्री आपात्कालीन परिस्थितीत रुग्ण शहरात आणणे जिकरीचे असल्याने तत्काळ नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनाकडून ठोस उपाय योजना झाल्या पाहिजे असे नागरिकाकडून बोलले जात आहे.

असे असले तरी ह्या पुलाखालच्या रस्त्याचा वापर उच्छल व नगर परिषद हद्दीतील खाकरफळी भागातील नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागत असून नगर परिषदे कडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने येथील नागरिक संतप्त झाले असून सोशल मीडियावरून नगर सेवक आणि पालिका प्रशासनाचा निषेध करतांना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com