Video मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तीन मिनिटात मंजूर केला सव्वा सात कोटीचा निधी

नंदुरबार नगरपालिकेच्या भव्यदिव्य इमारतीचे दिमाखात लोकार्पण
Video मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तीन मिनिटात मंजूर केला सव्वा सात कोटीचा निधी

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

येथील नगरपालिकेच्या (Municipality) नुतन इमारतीचे (new building) लोकार्पण मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते आज दिमाखात करण्यात आले. दरम्यान, न.प.च्या इमारत बांधकामासाठी शासनाकडे ७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी प्रलंबित असल्याबाबत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या भाषणात उल्लेख करताच ना.शिंदे यांनी व्यासपिठावरुनच मंत्रालयात (ministry) मोबाईलद्वारे संपर्क करुन कार्यक्रम संपण्यापुर्वीच सदर निधी मंजूर केला. मुुख्यमंत्र्यांच्या या कार्यतत्परतेमुळे नाटयगृहात एकच जल्लोष करण्यात आला.

येथील नगरपालिकेच्या नुतन इमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी इमारतीची पाहणी केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात उद्घाटनपर सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपिठावर आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, खा.डॉ.हीना गावित, खा.राजेंद्र गावित, आ.राजेश पाडवी, आ.किशोर दराडे, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, आ.शिरीष नाईक, आ.काशिराम पावरा, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी नगरपालिकेने गेल्या २० वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला. त्यानंतर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले, नंदुरबार नगरपालिकेला आतापर्यंत सर्वच मुख्यमंत्र्यांनी मोठया प्रमाणावर निधी दिला आहे.

विलासराव देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिराचे उद्घाटन केले. त्यावेळी १ कोटी रुपयांचा निधी प्रलंबित होता. त्यांनाही ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यांनी मुंबईला गेल्यावर तीनच दिवसात सदर निधी मंजूर केला होता,

असे श्री.रघुवंशी यांनी सांगताच, ना.शिंदे यांनी मंत्रालयात मोबाईलवरुन संपर्क साधला व नंदुरबार पालिकेच्या इमारतीचे प्रलंबित ७ कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची फाईल त्वरीत मंजूर करण्याचे आदेश दिले.

ना.शिंदे यांचे भाषण सुरु असतांनाच मंत्रालयातून ७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे पत्र प्राप्त झाले. कै.विलासराव देशमुख यांनी तीन दिवसात १ कोटीचा निधी मंजूर केला. मात्र, शिंदे यांनी तीनच मिनीटात ७ कोटी २८ लाखाचा निधी मंजूर केला. ना.शिंदे यांच्या या कार्यतत्परतेमुळे नाटयगृहात एकच जल्लोष करण्यात आला. तसेच विविध घोषणा देण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com