शहाद्यात पाच हजार चौरस फुट रांगोळीतून साकारले छत्रपती

औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैष्णवी पाटीलचे शिवरायांना अनोखे अभिवादन
शहाद्यात पाच हजार चौरस फुट रांगोळीतून साकारले छत्रपती

शहादा | ता.प्र.- SHAHADA

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील तृतीय वर्षाची (Student Vaishnavi Dharmendra Patil) विद्यार्थिनी वैष्णवी धर्मेन्द्र पाटील हिने ५ हजार चौरस फूट आकारात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा रांगोळीद्वारे साकारली. सदर (Rangoli) रांगोळी साकारण्यासाठी तिला तब्बल ४० ते ४५ तासांचा कालावधी वेळ लागला असून ८ क्विंटल रांगोळी लागली आहे.

संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्यात आली. आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांचे विचार आजच्या तरूणांमध्ये बिंबवण्यासाठी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थीनी वैष्णवी धर्मेंद्र पाटील हिने तब्बल ५ हजार चौरसफूट आकारात शिवरायांची प्रतिमा (Image of Shivaraya) रांगोळीद्वारे साकारली आहे.

या रांगोळी कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज दि.१९ रोजी संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक रमाकांत पाटील, जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील, सौ.यामिनी पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, माजी नगरसेवक के.डी.पाटील, रियाज कुरेशी, इक्बाल शेख, जितेंद्र जमदाडे, शिवस्मारक समितीचे अनिल भामरे,

माजी संचालक वकील पाटील, बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, विविध विद्या शाखांचे प्राचार्य यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीपक पाटील यांनी कु.वैष्णवी पाटील हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

तसेच आई-वडील, आजी-आजोबा, आत्या-मामा यांचाही सत्कार करण्यात आला. सदर रांगोळी ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये काढण्यात आली आहे. कु.वैष्णवी पाटील हिने प्रथमच ही रांगोळी काढली असून तिने एकटीने काढली आहे.

दि.१४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळपासून तिने रांगोळी काढायला सुरुवात केली. त्यात तिला जवळपास ५ ते ६ तास एवढा कालावधी लागला. दि.१५ ते १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत रंगकाम केले. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ही रांगोळी आकारास आली.

कु.वैष्णवी हिने एकंदरीत ५ दिवस आणि दररोज ९ ते १० तास असे एकूण ४० ते ४५ तासात तिने हे कार्य पूर्ण केले आहे. तिला ह्यासाठी तब्बल ८०० किलो रांगोळी लागली असून तिने यासाठी प्रचंड मेहनत घेऊन अतिशय जिद्द व चिकाटीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली अतिविशाल अशी आकर्षक रांगोळी साकारून अनोख्या पध्दतीने छत्रपतींना अभिवादन केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक रांगोळी बघण्यासाठी उपस्थित होते. यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com