चरणमाळ घाटात खासगी बसला भीषण अपघात

चरणमाळ घाटात खासगी बसला भीषण अपघात

नवापूर Navapur :

नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ घाटात (Charan Mal Ghat) प्रवाश्यांनी भरलेली खासगी बसला (private bus) भीषण अपघात (terrible accident) झाला आहे. या भीषण अपघातात ८ ते १० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात बसचा चालक बस खाली अडकला. या चालकाला मध्यरात्रीपर्यंत बाहेर काढण्याचे काम केले जात होते. जखमींना नवापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे

चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

खासगी लक्झरी बस महाराष्ट्रातून गुजरातकडे निघाली होती. नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या भीषण अपघातात नऊ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते.

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी

हा अपघात झाला त्यावेळेस मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे बचाव मोहिमेत अनेक अडचणी येत होत्या. दरम्यान, नवापूर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदत कार्य केले जात आहे. अपघातग्रस्त बसचा चालक गाडीखाली दाबला गेला असून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जखमी प्रवाशांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवाशांनी आक्रोश सुरू केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रशासनाच्या वतीने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी वेळोवेळी केली असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com