जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता: जिल्हा कृषि हवामान केंद्र

जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता: जिल्हा कृषि हवामान केंद्र

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department), प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, नंदुरबार जिल्ह्यात 7 ते 9 मार्च रोजी दुपारनंतर हवामान ढगाळ (weather is cloudy) होऊन तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस (rain.) पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान हवेचा वेग (Wind speed) जास्त राहील. पुढील पाच दिवसात दुपारचे कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस तर सकाळचे किमान तापमान 16 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. शेतकरी (Farmers) बांधवांनी 7 मार्चनंतर पावसाची शक्यता असल्याने पक्वता अवस्थेत असलेल्या मका, हरभरा, ज्वारी, गहु, इत्यादी पिकांची (crops) काढणी करून सुरक्षित ठिकाणी झाकुण ठेवावे.

तसेच उन्हाळी पेरणी केलेल्या पिकांत पावसाचा अंदाज (Rainfall forecast) लक्षात घेता आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत जेणेकरून जमिनितील ओलावा जास्तवेळ टिकुन राहील. भाजीपाला तसेच फळपिकांना आधार देण्याची व्यवस्था करावी. कृषि विज्ञान केंद्रात असलेल्या विकास भारती 90.8 रेडिओ केंद्राच्या (radio station) माध्यमातून दररोज सकाळी 10:40 वा. आणि संध्याकाळी 4:40 वा. हवामान अंदाज व कृषि सल्ला हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येतो जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी प्रसारित होणारा कार्यक्रम ऐकावा आणि शेतीचे हवामान आधारित व्यवस्थापन करताना उपयोग करावा असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र, (District Agricultural Meteorological Center) डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या मार्फत आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com