चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता

चिनोदा परिसरात कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता

चिनोदा ।Chinoda । वार्ताहर

तळोदा तालुक्यातील चिनोदासह (Chinoda) परिसरात कापसाची (cotton) मोठ्या प्रमाणावर लागवड (Cultivation) करण्यात आली होती. मात्र दि.11 व 12 ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या वादळी वार्‍यासह (gale force winds)परतीच्या जोरदार पावसामुळे (return heavy rains) तसेच दि.18 ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे कापसाच्या (cotton)उत्पन्नात घट (Chances of decline) येण्याची शक्यता असल्याचे जाणकार शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत असून कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी कापसाला लावलेला खर्च निघेल की नाही? या विवंचनेमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

दरम्यान जून महिन्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तर जुलै महिन्यात बर्‍यापैकी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात तर संततधार पाऊस होता. या तीन महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतशिवारातील पिके डोलू लागल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र ज्यावेळी कापसाची वेचणी तसेच बोंडे फुटण्याच्या अवस्थेत होती. नेमके त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीचा पाऊस व जोरदार वादळी वार्‍यामुळे कापसाची झाडे उन्मळून पडून बोंडे काळी पडण्याची तर काही बोंडे गळून फुलपात्री सुध्दा गळून पडण्याची शक्यता असल्याने यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांच्या उत्पन्नात घट येणार असल्याने त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. चिनोदासह परिसरात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हा कापूस बहुतांश स्थानिक व्यापार्‍यांच्या माध्यमातून विक्री होत असतो.

कापूस हे पिक हमखास उत्पन्न देणारे पिक असून या पिकाला मोठ्या प्रमाणात खते, बियाणे, निंदणी करणे, ठिंबक सिंचन, महागडी फवारणी औषधी आदीचा खर्च येत असतो. ऊस, केळी हे बारमाही पिकांला तोड म्हणून अनेक शेतकर्‍यांनी कापसाला अधिक प्राधान्य दिले होते. शेतकरी मोठे कष्ट घेऊन कापूस पिकवत असतात. तसेच कापसाला लागवडीपासून ते काढणीपर्यत मोठा खर्चही येत असतो. परंतु हातातोंडाशी आलेले कापसाचे पिक परतीच्या पावसामुळे वाया जाण्याची भिती त्यातच कापसाचे एकरी उत्पादनात घट येऊन कापसाला लावलेला खर्च सुध्दा निघणार नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाले असून निदान जो कापूस निघेल त्याला तरी योग्य हमीभाव मिळावा अशी अपेक्षा चिनोदासह परिसरातील शेतकर्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com