नवापुरात चड्डी बनियन गँग सक्रिय

चोरीचा प्रयत्न फसला, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
नवापुरात चड्डी बनियन गँग सक्रिय

नवापूर Nawapur | श. प्र.

नवापूर शहरात चड्डी बनियन गॅंग (Chaddi banyan gang) सक्रिय झाली आहे. या गँगने चोरीच्या इराद्याने (intent to steal) नवापूर शहरातील घाचीवाड्यात प्रवेश केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला.

नवापूर शहरातील घाचीवाडी अलशिफा हॉस्पिटल परिसरामध्ये काल मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान चड्डी बनियन गॅंग चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे नवापूर तालुक्यात चोरटे पोलिसांना आव्हान देत आहे. नवापूर शहरातील अल शिफा हॉस्पिटल नजीक असलेल्या सीस टिमोल यांच्या वॉल कंपाऊंडच्या दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांचा पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेने चोरटे पळाले. त्यानंतर हासिम पालावाला यांच्या घरच्या वरच्या मजल्यात चोरट्यांनी प्रवेश केला.त्याठिकाणी त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी पळ काढला.

चोरी करणारे चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. सदर चोरटे घरात शिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने नवापूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवापूर पोलीस या चोरट्यांचा जेरबंद करून नवापूरकरांची भीती दूर करतील का असा प्रश्न उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com