
नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी
माजी पालकमंत्री तथा आ.अॅड.के.सी.पाडवी (Former Guardian Minister and MLA.Adv.K.C.Padvi) यांची बदनामीकारक मजकूर (defamatory content) व्हाट्सअप वर(WhatsApp) टाकल्याप्रकरणी एकाविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा (Case against) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी आदिवासी विकासमंत्री तथा आ.अॅड.के.सी.पाडवी यांची बदनामी व्हावी, या उद्देशाने रविंद्र वळवी याने त्याच्या मोबाईलवरून व्हाट्अप युवक काँग्रेस अक्कलकुवा तसेच किसान काँग्रेस अक्कलकुवा या गृपवर बदनामीकारक मजकूर प्रसारीत केला म्हणून जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निलेश किशोर निकम रा.अनरद ता.शहादा यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात रविंद्र वळवी रा.मुदंलवड ता.धडगाव याच्या विरूध्द भादंवि कलम 500 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई राहुल भदाणे करीत आहेत.