खरीप हंगामासाठी सूक्ष्म नियोजन करावे

पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश
खरीप हंगामासाठी सूक्ष्म नियोजन करावे

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

येत्या खरीप हंगामासाठी (kharif season) शेतकर्‍यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन (Careful planning) करावे, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हयाचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी. पाडवी (Guardian Minister Adv. K.C. Padvi) यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, आ.डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रधुनाथ गावडे, कृषी सभापती गणेश पराडके, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ.मैनक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी एल.डी.भोये आदी उपस्थित होते.

पालकमंत्री अ‍ॅड.पाडवी (Guardian Minister Adv. K.C. Padvi) म्हणाले, खरीप हंगाम 2022-2023 साठी शेतकर्‍यांना उपलब्ध करुन येणारे बियाणे चांगल्या दर्जाची असावे. राष्ट्रीयकृत बॅकांनी कृषी कर्ज वाटपाला प्राधान्य द्यावे. 127 हेक्टर क्षेत्रात एरंडी लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रासायनिक खते विक्रेत्यांनी पॉस मशिनद्वारेच खताची विक्री करावी. खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री बियाणे, खते तसेच कृषि निविष्ठा विक्री करणार्‍यावर कठोर कारवाई करावी.

युरीयाचा वापर कमी होण्यासाठी नॅनो युरियाचा (नॅनो युरियाचा) वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी प्रत्येक दुकानात नॅनो युरिया वापराबाबतचे जनजागृतीपर फलक लावण्यात यावेत. ठिबक सिंचन क्षेत्र वाढवावे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा व गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा यासाठी जनजागृती करावी. वीज जोडणी पूर्ण करावी, शेतकर्‍यांच्या मागणीनुसार खताच्या बियाणे विक्रेत्यांनी उपलब्ध करुन द्यावे. सेंद्रीय खताचा कंपोस्ट, गांडुळ खत, जिवाणू खते वापरण्यासाठी जनजागृती करावी.

श्री.भागेश्वर म्हणाले की, खरीप हंगाम 2022 साठी भात, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन व इतर बियाण्यांसाठी 23 हजार 377 क्विंटल बियाण्यांची मागणी (Demand for seeds) करण्यात आली आहे. बी.टी कापूस बियाण्यासाठी 6 लाख 25 हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी 3 हजार 30 मे.टन युरिया व 590 मे.टन डि.ए.पी. संरक्षितसाठा मंजूर केला आहे. खरीप हंगामासाठी 1 लाख 34 हजार 800 मे.टन रासायनिक खताची (chemical fertilizers) मागणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com