नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर कार व मोटरसायकलीची धडक : मोटरसायकल जळून खाक

नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर कार व मोटरसायकलीची धडक : मोटरसायकल जळून खाक

नवापूर Navapur । श.प्र.-

खांडबारा-नंदुरबार रस्त्यावर (Nandurbar-Khandbara road) अल्टो कार (Car) आणि दुचाकीच्या (motorcycle) झालेल्या भीषण अपघातात (accident) दोन पुरुष एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात पेट घेतल्याने मोटरसायकल (motorcycle) पूर्णतः जळून (Burn) खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, खडकी हूऊ बजाज कंपनीची मोटरसायकल (motorcycle) (क्रमांक एमएच 39 एएच 9150) वर परविन बकाराम सूर्यवंशी (वय 22) व त्याची आई सविता बकाराम सूर्यवंशी सोबत नंदुरबारला दवाखान्याच्या (hospital) कामासाठी जात होते. भादवड गावानजीक समोरून येणारी अल्टो कार (Car) (क्रमांक एमएच39-6107)यांची समोरासमोर धडक झाल्याने सविता बकाराम सूर्यवंशी, परविन बकाराम सूर्यवंशी व दिनेश विनायक पाटील (रा.नंदुरबार)ते तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की अपघात (accident) होताच दुचाकीला आग लागून दुचाकी वाहन जळून (Burn) खाक झाली. दिनेश विनायक पाटील या व्यक्तीला डोक्यावर व हाता पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

अपघात होताच घटनास्थळी आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत घटनास्थळी मदत केली. तिघी जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खांडबारा पोलीस (police) ठाण्याचे पोलीस अमलदार विश्वास गावित, अंमलदार सुरेश चौरे, प्रवीण अहिरे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले. अपघातस्थळी वाहतूककोंडी देखील झाली होती. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने वाहनांना रस्त्याच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत केली.

Related Stories

No stories found.