अन्य धर्माचे आचरण करणार्‍या आदिवासींच्या सवलती रद्द करा

तळोदा येथे जनजाती सुरक्षा मंचतर्फे आयोजित आदिवासी महासंमेलनात ऍड.हिंमत तावडे यांची मागणी
अन्य धर्माचे आचरण करणार्‍या आदिवासींच्या सवलती रद्द करा

मोदलपाडा | वार्ताहर- MODALPADA

ज्या आदिवासी (tribals) लोकांनी आपल्या पूर्वजांची रूढी परंपरा, पूजा पद्धती, संस्कृती सोडून दिली आहे व अन्य धर्मांच्या पूजापद्धतीचे आचरण करायला सुरुवात केली आहे, अशा लोकांना आदिवासी संस्कृतीमधून (Tribal culture) किंवा आदिवासींच्या नावाखाली मिळणार्‍या सवलती, आरक्षण रद्द करण्यात यावे अशी मागणी जनजाती सुरक्षा मंचचे (Tribal Security Forum) ऍड. हिम्मत तावड यांनी तळोदा येथे झालेल्या आदिवासी महासंम्मेलनात (Tribal Convention) केली.

तळोदा येथिल वामनराव बापूजी मंगल कार्यालयात आज जनजाती सुरक्षा मंच अंतर्गत आदिवासी समाजाचे महासंम्मेलनाचे (Tribal Convention)आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय टीम सदस्य व देवगिरी कल्याण आश्रमचे संयोजक डॉ.विशाल वळवी, देवल्या महाराज, क्षेत्रीय सहसंघटन मंत्री गणेश गावित, सहसचिव देवगिरी प्रांत विरेंद्र वळवी, देवगिरी कल्याण आश्रमचे अध्यक्ष गिरीश वसावे, श्रीमती रजुबाई पावरा, श्रीमती कल्पना पाडवी आदी उपस्थित होते.

ऍड.तावड म्हणाले की, जनजाती सुरक्षा मंच अंतर्गत ही आदिवासी महासम्मेलन व मोर्चे अशी मोहीम संपूर्ण जिल्ह्यात व देशभरात राबविण्यात येत आहे. ही मोहीम राबविण्याचा उद्देश असा आहे की भारतामधील जनजाती समाजातील काही ठिकाणी आदिवासी लोकांनी ख्रिचन, मुसलमान असे धर्मांतर (Conversion) केले आहे. हे लोक हे दोघी ठिकाणी लाभ घेत आहेत. म्हणजे घरकुलापासून एमबीबीएस च्या उच्च शिक्षणापर्यंत लाभ घेत आहेत. तुम्ही एकाच ठिकाणी लाभ घ्या, इकडे घ्या किंवा तिकडे घ्या, आदिवासी लोकांना आपली संस्कृती टिकवू द्या, ज्यांनी धर्मांतर केले आहे त्या व्यक्तींनी आदिवासी संस्कृतीचे (Tribal culture) परंपरेचे जतन करण्याचे कार्य बंद केले आहे. या विषयावर संविधान कलम ३४२ नुसार संशोधन करून अशा लोकांच्या लिस्टिंग तयार करून त्यांना आदिवासींच्या नावावर मिळणारे फायदे, आरक्षण रद्द करण्यात यावे व जे लोक याहामोगी मातेला मानत नाही अशा लोकांना आदिवासी म्हणण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. विशाल वळवी यांनी देखील डीलिस्टिंग विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा चौक पासून स्मारकचौक, मेन रोडवरून मोर्चा काढून करण्यात आली. वामन बापू मंगल कार्यालय येथे सर्वांचे एकत्रीकरण करण्यात आले. या दिवसभराच्या कार्यक्रमाला तळोदा तालुका तसेच नंदुरबार जिल्ह्यातून हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com