चितवी जि.प.गटाची पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार!

चितवी जि.प.गटाची पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार!

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) चितवी गट (Chitvi Group) व पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) असली गणाच्या पोटनिवडणुकीच्या (By-election) निकालानंतर जिल्हा परिषद तसेच धडगाव पंचायत समितीच्या सत्तेवर कुठलाही परिणाम होणार नसला तरी येत्या १७ जुलै रोजी होणार्‍या जि.प.अध्यक्ष पदाच्या निवडीवर (election of ZP President) निश्‍चितच परिणामकारक (Effective) ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चितवी गटाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

चितवी जि.प.गटाची पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार!
चुंचाळ्यात उद्या साजरा होतोय गुरूशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा

जिल्हा परिषदेच्या ५६ गट व पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी दि.७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक (election) घेण्यात आली होती. यात भाजपा (bjp) व कॉंग्रेसने (Congress) प्रत्येकी २३ जागांवर तर राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळविला होता.

मात्र, शिवसेनेने (Shiv Sena) सात जागा मिळवून सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचे तब्बल ७ उमेदवार निवडून आले असून सत्तेतही सहभाग घेतला आहे. शिवसेनेने पाठींबा दिल्याने कॉंग्रेसच्या (Congress) ऍड.सीमा पद्माकर वळवी या जि.प.अध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या. शिवसेनेला उपाध्यक्ष पदासह दोन सभापतीपद मिळाले.

या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन उमेदवार निवडून आले होते. विशेष म्हणजे हे तीनही उमेदवार नवापूर तालुक्यातील आहेत. यापैकी चितवी (ता.नवापूर) गटातील जि.प.सदस्य सुरेश सुरुपसिंग गावित यांचे निधन झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून ही जागा रिक्त होती. तर असली (ता.धडगाव) पंचायत समिती गणातून जिल्हयाचे पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी यांच्या भगिनी श्रीमती गिताबाई पाडवी या निवडून आल्या होत्या.

दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्दयावरुन जिल्हा परिषदेतील ११ ओबीसी संवर्गातील उमेदवारांचे सदस्यत्व रद्द (Candidates' membership canceled) करण्यात आले. त्या जागांवर नव्याने निवडणूका घेवून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी देण्यात आली.

या संधीचा लाभ घेत पालकमंत्र्यांच्या भगिनी गिताबाई पाडवी यांनी खापर जिल्हा परिषद गटातून खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढविली. यात त्यांचा विजयही झाला. त्यामुळे त्यांची असली येथील पं.स.गणाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त होती.

त्यामुळे चितवी गट व असली गण या दोन्ही रिक्त जागांसाठी आता पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि.१७ ते २३ मे दरम्यान उमेदवारी अर्ज विक्री (Candidature application sale) व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

दि.२४ मे रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यत येणार आहे. त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि.२७ मे रोजी नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकार्‍याने (Returning officers) दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची मुदत आहे.

दि. ३० मे रोजी जिल्हा न्यायाधिश अपिलावर सुनावणी करुन निकाल देतील. त्याच दिवशी अपिलावर सुनावणी व निकाली काढल्यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवशी जेथे अपिल नाही अशा उमेदवारी अर्जांची माघारीची मुदत आहे. दि.१ जून रोजी ज्या अर्जांवर अपिल आहे तेथे उमेदवारी अर्ज ( candidature application) माघारीची (Withdrawal) मुदत आहे.

दि.३० मे रोजी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि.५ जून रोजी सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान मतदान (Voting) घेण्यात येणार आहे. दि.६ जून रोजी मतमोजणी (Counting of votes) करण्यात येणार आहे.

दरम्यान, या दोन्ही पोटनिवडणुकांचा जिल्हा परिषद तथा धडगाव पंचायत समितीच्या सत्तेवर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण सदर जागा ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची होती. त्यांचा सत्तेत सहभाग नाही. तसेच या जागेवर कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडला तरी संख्याबळामध्ये फारसा फरक पडणार नाही.

याशिवाय धडगाव पंचायत समितीत शिवसेनेचे ७, कॉंग्रेसचे ४, भाजपाचे २ तर एक अपक्ष असे संख्याबळ आहे. गिताबाई पाडवी यांची जागा रिक्त झाल्याने तेथे कॉंग्रेसची एक जागा कमी झाली आहे. मात्र, सत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही.

दरम्यान, येत्या १७ जुलै रोजी विद्यमान जि.प.अध्यक्षा (ZP President) ऍड.सीमा वळवी यांचा अडीच वर्षाच कार्यकाळ पूर्ण होत आहे. पुढील अडीच वर्ष जि.प.अध्यक्षपद (ZP President) हे अनुसूचित जमाती स्त्री राखीव आहे. त्यामुळे अध्यक्षांची नव्याने निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपद महिला राखीव असल्यामुळे या पदासाठी ऐनवेळी अनेक दावेदार पुढे येण्याची शक्यता आहे.

चितवी गटात राष्ट्रवादीचे सुरेश सुरुपसिंग गावित हे विजयी झाले होते. त्यांना ६ हजार ३७३ मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी तत्कालीन कॉंग्रेस उमेदवार बकाराम गावित यांना ४ हजार ५२४ मते मिळाली होती तर अपक्ष बिपीन गावित यांना २ हजार ४११ मते मिळाली होती.

आता बकाराम गावित हे शिवसेनेत आहेत. त्यामुळे या जागेवर निश्‍चितपणे शिवसेनेकडून ते उमेदवार राहतील. तर माजी जि.प.अध्यक्षा तथा आ.शिरीषकुमार नाईक यांच्या पत्नी सौ.रजनी नाईक यादेखील कॉंग्रेसकडून उमेदवारी करु शकतात.

कै.गावित हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंंग्रेसदेखील या जागेवर दावा करु शकते. त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची दावेदारी असल्यामुळे सदर निवडणूक बिनविरोधही होवू शकते.

मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेची गणिते जशीच्या तशी राहणार असली तरी आगामी जि.प.अध्यक्ष पदाच्या निवडीवर निश्‍चितपणे परिणामकारक ठरु शकते. त्यामुळे चितवी गटाची पोटनिवडणूक (By-election) लक्षवेधी ठरणार आहे.

Related Stories

No stories found.