Breaking News नंदुरबारात पाच हजाराची लाच स्विकारतांना विस्तार अधिकार्‍यास अटक

रोहयो अंतर्गत विहिर अनुदानाची रक्कम मंजूर करण्यासाठी स्विकारली लाच
Breaking News नंदुरबारात पाच हजाराची लाच स्विकारतांना विस्तार अधिकार्‍यास अटक

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

तालुक्यातील रनाळे खुर्द शिवारातील शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून विहिरीच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्याकरिता येथील पंचायत समितीतील विस्तार अधिकारी भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे याला ५ हजाराची लाच घेतांना आज पंचायत समिती कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.

यातील तक्रारदारांचे रनाळे खुर्द शिवारातील शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून विहिरीच्या अनुदानाची रक्कम तक्रारदार यांना मिळवून देण्याकरिता

नंदुरबार येथील पंचायत समितीतील विस्तार अधिकारी भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे याने तक्रारदाराकडून ५ हजार रुपये लाचेची मागणी करून आज दि.१९ जून २०२३ रोजी पंचायत समिती कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीवर पंच साक्षीदारांच्या समक्ष स्विकारली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक तथा पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विजय ठाकरे, विलास पाटील, ज्योती पाटील, पोना संदीप नावाडेकर, देवराम गावित, मनोज अहिरे, पोना अमोल मराठे, चालक पोना जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली. त्यांना पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक वाचक नरेंद्र पवार ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com