अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जागीच ठार

भवर येथे घडली घटना
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जागीच ठार

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

अज्ञात वाहनाने मोटारसायकलीस जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भवर ता.तळोदा येथे घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश पारता वसावे (वय ३६) व हांजा रूपा वसावे (वय ३४, दोघे रा. चिवलउतार (ता.अक्कलकुवा) ह.मु. विद्यानगरी तळोदा हे दोघे मोटरसायकल( क्र. एम एच ३९ एजी २५५२) हिच्यावर तळोदाकडे येत असताना भवर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात निलेश व हांजा हे दोघेजण जागीच ठार झाले. या प्रकरणी असुबाई निलेश वसावे (वय ३२ रा . विद्यानगर तळोदा) यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसात मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com