
नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी
ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी (Reading culture) ग्रंथप्रेमींना (book lovers) एकाच ठिकाणी ग्रंथ, साहित्य विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग (State Department of Higher and Technical Education,), ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई (Directorate of Libraries, State of Maharashtra, Mumbai)आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, (Office of the District Library Officer,) नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा मंगल कार्यालय, नंदुरबार येथे 5 व 6 डिसेंबर, 2022 रोजी नंदुरबार ग्रंथोत्सव-2022 (Nandurbar Book Festival-2022) चे आयोजन (organized) करण्यात आले असून या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती, ग्रंथोत्सव संयोजन समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.
ग्रंथोत्सवातील कार्यक्रमांची रुपरेषा:
सोमवार 5 डिसेंबर,2022 रोजी सकाळी 9.00 वा. ग्रंथदिंडीने होणार आहे. ही ग्रंथदिंडी नेहरु पुतळा- हाटदरवाजा- काकाचा ढाबा मार्गे इंदिरा मंगल कार्यालय या मार्गावरुन काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ नंदुरबार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ग्रंथोत्सावाचे उद्घाटन सकाळी 11.00 वा. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री, नंदुरबार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत तर अध्यक्षस्थानी खा.डॉ.हिना गावीत राहणार असून या कार्यक्रमास आमदार अमरीशभाई पटेल, डॉ.सुधीर तांबे, किशोर दराडे, आमश्या पाडवी, अॅड.के.सी.पाटील, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, नगराध्यक्षा रत्नारघुवंशी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.पितांबर सरोदे, दिनानाथ मनोहर याची प्रमुख उपस्थिती राहील.
ग्रंथोत्सोवात पहिल्या दिवशी प्रथम सत्रात सकाळी 12.30 ते 1.30 वाजता वाचन संस्कृती काल- आज-उद्या, 21 व्या शतकातील वाचन संस्कृती कोरोनानंतरचे वाचन संस्कृती पुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान असून अध्यक्षस्थानी प्रभाकर भावसार हे असून प्रमुख वक्ते म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठ विभागाचे प्रा.डॉ.राजेंद्र कुंभार असणार आहेत. दुसरे सत्रात दुपारी 2 ते 3.30 वाजता कथा परिसंवाद कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सौ.अलका कुलकर्णी, प्रा.डॉ.आर.ए.पाटील, प्रा.डॉ.माधव कदम यांचा सहभाग असणार आहे. तर तिसरे सत्रात दुपारी 4 ते 5.30 वाजता स्पर्धा परीक्षांना सामोरे जातांना मार्गदर्शकफ या स्पर्धा परिक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री अध्यक्षस्थांनी राहणार असून प्रमुख अतिथी व सादरकर्ते म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की हे असणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या दुसर्या दिवशी मंगळवार 6 डिसेंबर, 2022 रोजी 12.30 ते 1.30 वाजता कवी शांताबाई शेळके, श्री.वसंत बापट, श्री.शंकर रमाणी यांच्या जन्म शताब्दी निमित्त परीसंवाद कार्यक्रम म होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पितांबर सरोदे असतील तर प्रा.प्रशांत बागुल, सिमा मोडक, डॉ.गिरीष पवार यांचा सहभाग राहणार आहे. दुसरे सत्र दुपारी 1 ते 2.30 वाजता ङ्गस्थानिक कवींचे कवी संमेलनफ असणार असून अध्यक्षस्थानी सौ.जया नेरे असतील तर सौ.सुनंदा भावसार, निंबाजीराव बागुल, विष्णु जोंधळे यांचा विशेष सहभाग असणार आहे. तिसरे सत्र दुपारी 3 ते 4.00 दरम्यान आझादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वांतत्र्य लढ्यात खान्देशचे योगदान या विषयावर प्रा.डॉ.सर्जेराव भामरे वक्ते राहणार आहेत. त्यानंतर ग्रंथोत्सव-2022 चा समारोप होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे राहतील. तर प्रा.डॉ.विश्वास पाटील, प्रा.डॉ.सुनंदा पाटील, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
याठिकाणी वाचनप्रेमींसाठी एकाच ठिकाणी विविध ग्रंथ, साहित्य व वाड्.मय विषयक पुस्तके सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय मुद्रणालयाची विविध प्रकाशन, राज्य मराठी विकास संस्था, दर्शनिका विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ, शासकीय संस्थांच्या विक्री केंद्रांचाही या ग्रंथोत्सवात समावेश असणार आहे.
या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक,पत्रकार, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एम.व्ही.कदम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, नंदुरबार जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.पितांबर सरोदे, उपाध्यक्ष रमाकांत पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य डॉ.माधव कदम, रोटरी क्लबचे अध्यक्ष शब्बीरभाई मेमण, आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे मुख्य संयोजक भिमसिंग वळवी, महिला महाविद्यालय,नंदुरबारचे ग्रंथपाल श्रीराम दाऊतखाने, साहित्यीक डॉ.सुनंदा पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक प्रविण पाटील, सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी संयुक्तपणे केले आहे.