कोळदे गटातून भाजपच्या सुप्रिया विजयकुमार गावित १३६९ मतांनी विजयी

खापर गटातून कॉंग्रेसच्या गीता पाडवी व अक्कलकुवा गटातून काँग्रेसच्या सूरया मकरांनी विजयी
कोळदे गटातून भाजपच्या सुप्रिया विजयकुमार गावित १३६९ मतांनी विजयी

नंदुरबार- Nandurbar प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद गट व १३ पंचायत समिती गणांसाठी आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस सुरूवात झाली असून या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे प्रतिष्ठापणाला लागली आहे. नंदुरबार येथे १४ टेबलवर २२ राऊंडमध्ये, शहादा येथे १४ टेबलवर १४ राऊंडमध्ये तर अक्कलकुवा येथे १२ टेबलवर ३ राऊंडमध्ये मतमोजणी सुरु आहे.

निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून कोळदे गटातून भाजपच्या सुप्रिया विजयकुमार गावित या १३६९ मतांनी विजयी झाल्या आहेत. तर खापर गटातून कॉंग्रेसच्या गीता पाडवी व अक्कलकुवा गटातून काँग्रेसच्या सूरया मकरांनी विजयी झाल्या आहेत. होळतर्फे हवेली गणात भाजपच्या सीमा मराठे १११ मतांनी विजयी झाल्या असून भाजपच्या सीमा मराठे यांना २६८८ मते तर सेनेच्या स्वाती मराठे यांना २५७७ मते मिळाली आहेत.

Related Stories

No stories found.