
शहादा Shahada । ता.प्र.-
गेल्या पाच पंचवार्षिकपासून काँग्रेसचा गड (congress camp) असलेल्या व्यारा व निझर मतदार संघात (Vyara and Nijhar constituencies) भाजपला घवघवीत (bjpla ghavghveet yash) यश मिळाले. येथील आ.राजेश पाडवी (MLA.Rajesh Padvi) यांच्याकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी तापी जिल्हा प्रभारी (Tapi District Incharge) म्हणून नियुक्ती (appointment) केली होती. अहोरात्र मेहनत करत त्यांनी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत कार्यकर्त्यांच्या सहकार्याने विजयश्री (vijayshree) खेचून आणली.
गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यालगत असलेल्या तापी जिल्हा प्रभारी म्हणून भाजपचा वरिष्ठ नेत्यांनी आ. राजेश पाडवी यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. व्यारा आणि निझर विधानसभा मतदारसंघात अहोरात्र मेहनत घेत व्यारा विधानसभा मतदारसंघातून मोहन कोकणी व निझर विधानसभा मतदारसंघातून डॉ.जयराम गामीत विजयी झाले. त्यांच्या विजयात येथील कार्यकर्त्यांनी विजयश्री खेचून आणली.
गेल्या पाच पंचवार्षिकपासून काँग्रेसचा गड असलेल्या दोन्ही मतदार संघात भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. आ.राजेश पाडवी यांच्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.