मोड येथून भाजपातर्फे बूथ संपर्क अभियानास सुरुवात

मोड येथून भाजपातर्फे बूथ संपर्क अभियानास सुरुवात

बोरद Board ता. तळोदा । वार्ताहर

तळोदा तालुक्यातील मोड येथून भाजपातर्फे बूथ संपर्क अभियानाची Booth contact campaign by BJP सुरुवात करण्यात आली. यावेळी आ.राजेश पाडवी MLA Rajesh Padvi यांच्या मार्गदर्शनाखाली मोड गावातील भाजपा किसान मोर्चा BJP Kisan Morcha प्रदेश सरचिटणीस प्रविणसिंग राजपूत Pravin Singh Rajput to the State General Secretaryयांच्या वाड्यात अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रविणसिंग राजपूत यांनी प्रस्तावना केली.तर भाजपा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. शक्तीप्रमुख महेश नवले यांनी बुथप्रमुख यांचे काम व कार्य याबाबत थोडक्यात माहिती दिली.

त्यानंतर तळोदा शहादा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बूथप्रमुख हा गावाचा दुवा आहे. बुथप्रमुख हा गाव पातळीवर पक्ष वाढीसाठी खूप मेहनत घेत असतो. तसेच बुथप्रमुखानी गावात कोण-कोणती कामे करावी याबाबत चर्चा केली. सदरील संपर्क अभियान बोरद, मोड, खरवड ह्या गावांमध्ये घेण्यात आले.

तसेच आमलाड ते बोरद रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट असून ठेकेदारावर कार्यवाही करावी, शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण बस सेवा सुरू करावी, बिबट्याचा बंदोबस्त करून पशुपालकांना भरपाई मिळवून द्यावी अशा अनेक समस्या जाणून घेतल्या. व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन सुद्धा यावेळी दिले.

यावेळी मतदार संघ प्रभारी नारायण ठाकरे, आदिवासी आघाडी ता.अध्यक्ष दारासिंग वसावे, विठ्ठल बागले, प्रवीण वळवी, कृष्णा पाडवी, गोपी पाडवी, विकास ठाकरे, भाजपा शक्ती केंद्र प्रभारी रणजित वळवी, बूथ अध्यक्ष महेश नवले, राधेश्याम शिंदे, दिपक वळवी इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com