भाजप स्विकृत नगरसेविका ज्योती राजपूत यांचा राजीनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले स्वागत
भाजप स्विकृत नगरसेविका ज्योती राजपूत यांचा राजीनामा

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

येथील भाजपाच्या नगरसेविका ज्योती योगेश राजपूत (Jyoti Yogesh Rajput) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resignation) जिल्हाधिकार्‍यांकडे (Collector) सुपूर्द केला आहे. दरम्यान, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणार असल्याचे सांगत त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी त्यांचे स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका ज्योती योगेश राजपूत यांनी स्वीकृत नगरसेवक पदाच्या राजीनामा (resignation) दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने ज्योती राजपूत (Jyoti Yogesh Rajput) यांची स्वीकृत नगरसेवकपदी त्यांची निवड करण्यात आली होती.

शिवसेनेचे नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणार असल्याचे सांगत नगरसेविका ज्योती राजपूत यांनी जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री (Collector Mrs. Manisha Khatri) यांच्याकडे आपल्या पदाच्या राजीनामा सोपवला. ज्योती राजपूत यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com