माझी वसुंधरा अभियानांतर्गत नवापूर नगरपालिकेतर्फे सायकल रॅली

माझी वसुंधरा अभियानांतर्गत नवापूर नगरपालिकेतर्फे सायकल रॅली

नवापूर । Navapur श.प्र.

माझी वसुंधरा अभियान (My Earth Expedition) अंतर्गत नवापूर नगरपालिकेतर्फे (Navapur Municipality) सायकल रॅलीच्या (Cycle Rally) शुभारंभ नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील (Mayor Hemalatha Ajay Patil) यांचा हस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेवक,न.पा कर्मचारी यांनी नवापूर शहरात सायकल रॅली काढुन शहरात वायु प्रदुषण कमी करणे,जल प्रदुषन कमी करणे,पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी पाण्याचे पुनर्भरण(रेनवाटर हारवेस्टीग) करणे,वृक्ष लागवड करुन संवर्धन करणे,इंधन बचती साठी अपारंपारीक उर्जा स्ञोत सौर उर्जेचा वापर करुन दिवे लावने,विजेचा वापर कमी करणे,या बाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी गटनेता आशिष मावची, नगरसेविका मिनल लोहार, नगरसेवक आरीफ पालावाला,विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे,नगरसेवक हारुन खाटीक,विशाल सांगळे,महेंद्र दुसाने,माजी नगरसेवक अजय पाटील,सुभाष कुंभार,मुख्यधिकारी विनायक कोते,प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार,सतिष बागुल,प्रकल्प अधिकारी प्रशांत भट,अंनत पाटील,नाथीराम देसाई,राहुल पिगळे,मंगेश गायकवाड,रमेश सोनार,प्रकाश ब्राम्हणे,नगरसेवक न पा कर्मचारी यांनी वसुंधरेची काळजी घेऊ या नवापूर शहराला हरित बनवुया अशा घोषना देत जनजागृती करण्यात आली.

सायकल रॅली मेनरोड,गांधी पुतळा,लिमडावाडी,शिवाजी रोड,सरदार चौक,येथुन फिरुन नवापूर नगरपालिका कार्यालयात सांगता करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com