धडगाव येथे शाही पद्धतीने भरला भोंगर्‍या बाजार

धडगाव येथे शाही पद्धतीने भरला भोंगर्‍या बाजार

मोलगी Molgi । वार्ताहर-

धडगांव (Dhadgaon) येथे शाही पद्धतीने भोंगर्‍या बाजार (Bhongarya Bazaar) भरविण्यात आला. आदिवासी सास्कृतिक परंपरेनुसार (Tribal cultural traditions) राजेशाही पद्धतीने भोंगर्‍या बाजाराची रॅली (Rally) उत्साहात काढण्यात आली.

यावेळी पोलीस पाटील भिमसिंग पराडके, मंगेश पराडके, जि.प.सभापती गणेश पराडके, जि.प.सदस्य विजयसिंग पराडके, जि.प.सदस्य रवींद्र पराडके, जामसिंग पराडके, भरत पराडके, धडगाव येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षी भोंगर्‍या बाजार भरला नव्हता. त्यामुळे यंदा मात्र मोठ्या उत्साहात तालुक्यातील लोक भोंगर्‍या बाजार बघण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे धडगांव शहरात यात्रेचे स्वरूप आले होते.

परंपरेनुसार ढोलची स्पर्धा (Drum competition) मानसिंग स्टेडियम मध्ये घेण्यात आली. यावेळी ढोल वादक, ढोल प्रेमी उपस्थित होते. याठिकाणी ज्याचा ढोल मधूर व मोठया आवाजाचा वाजला त्याचा गाजावाजा संपूर्ण तालुक्यात होत असते. भोंगर्‍या बाजाराला (Bhongarya Bazaar) आदिवासी समाजात मानाचे व महत्वाचे स्थान दिले जाते. पूर्वीसारखा यावर्षी मात्र आर्थिक उलाढाल फारच कमी झाल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

बाजारात होळीसाठी लागणारे साहित्य डाळ्या, गूळ, खोबरे, खारीक, तसेच बावा बुध्यासाठी लागणारे साहित्य घुंगरू, मोराची पिसे, रंगीबेरंगी पताके असे साहित्य भोंगर्‍या बाजारातून घेताना दिसून आले. गेल्या दोन वर्षापासून कुठलाही सण उत्सव झाला नाही. त्यामुळे यंदा मात्र सण उत्सव सुरु झाल्यामुळे चैतन्याचे वातावरण (atmosphere of consciousness) दिसून आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com