प्रशंसा तंवरला उत्कृष्ट बालकलाकार अ‍ॅवॉर्ड जाहीर

प्रशंसा तंवरला उत्कृष्ट बालकलाकार अ‍ॅवॉर्ड जाहीर

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी-

‘बटरफ्लाय’ ('Butterfly') या लघु हिंदी चित्रपटातील (short Hindi film) बालकलाकार प्रशंसा तंवर (Child actor Pratishna Tanwar) हिस सेव्हन सिस्टर्स नॉर्थ ईस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Seven Sisters at the North East International Film Festival) उत्कृष्ट बालकलाकार अ‍ॅवॉर्ड (Best Child Artist Award) जाहीर करण्यात आला आहे. प्रशंसा तंवर ही येथील स्मित हॉस्पिटलचे संचालक निलेश तंवर व राखी तंवर यांची कन्या आहे.

नंदुरबार येथील बालरोग तज्ज्ञ डॉ.सुजित पाटील दिग्दर्शीत बटरफ्लाय या लघु हिंदी चित्रपटात बालकलाकार प्रशंसा तंवर हिने अभिनय केला होता. प्रशंसा तंवरच्या अभिनयाला सर्व स्तरावरून दाद मिळाली होती.

त्यातच सेव्हन सिस्टर्स नॉर्थ ईस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रशंसा तंवर हिस उत्कृष्ट बालकलाकार अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.

आतापर्यंत प्रशंसा हिस आर्यन एम प्रोडक्शन लखनऊ आयोजित हुनरके हुन्नरबाज नृत्य स्पर्धा 2021 (प्रथम), नंदुरबार येथील नगराध्यक्षा करंडक देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत (प्रथम), डेझनिंग फेस ऑफ पुणे 2019 विजेती, शायनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र 2019 विजेती, सुपर स्टार कलाकार ऑनलाईन रोटरी शो 2020 (प्रथम), फॅशन फेस्टिवल नंदुरबार 2019 विजेती, जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘डॉक्टर्स फॉर बेगर्स’ या एकांकिकेत अभिनय केला आहे. तसेच बटरफ्लायसह मी एक स्वप्न पाहिले या मराठी लघु चित्रपटात देखील अभिनय केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com