संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

संजय गांधी निराधार योजनातंर्गत (Sanjay Gandhi Niradhar Yojana) पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी (Guardian Minister Adv. K.C.Padvi) यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेचे 451, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे 448, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेचे 173, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे 323, इंदिरा गांधी विकलांग योजनेचे 3 असे एकूण 1 हजार 398 पात्र लाभार्थ्यांना (Beneficiaries) लाभ मंजूरीचे (Certificate of Benefit) प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राम रघुवंशी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मलाताई राऊत, संजय गांधी निराधार अनुदान समिती अध्यक्ष तथा जि.प सदस्य देवमन पवार, पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले, प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष दिलीप नाईक, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नगरसेवक दिपक दिघे, अतुल पटेल, चेतन वळवी, परवेज खान, संजय गांधी निराधार समिती सदस्य रंजनाताई नाईक, दिपक गवते, इकबाल खाटीक, विश्वनाथ वळवी, भास्कर पाटील, स्वरुप बोरसे, तसेच इतर समिती सदस्य व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री अ‍ॅड. के.सी. पाडवी, जि.प.उपाध्यक्ष अ‍ॅड. राम रघुवंशी, दिलीप नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.