नंदुरबारकरांनो सावध व्हा.. विनामास्क फिरणार्‍या दोन हजार जणांविरूध्द कारवाई

नंदुरबारकरांनो सावध व्हा..  विनामास्क फिरणार्‍या दोन हजार जणांविरूध्द कारवाई
संग्रहीत

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलातर्फे (Police force) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत विनामास्कच्या (Without masks) एकूण 2 हजार 34 केसेस करण्यात आल्या असून त्यात एकूण 4 लाख 13 हजार 400 रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. तर कोविड अनुषंगाने 124 जणांविरूध्द 77 गुन्हे दाखल (Crime filed) करण्यात आले आहे.

दि. 1 ते 14 जानेवारी या कालावधीत नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे कोरोना संदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीसस्टेशनला ठिकठिकाणी नाकाबंदी व फिक्सपाँईट लावून विनामास्क कारवाई करून दंड वसुल करण्यात आला. तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमेवरही नाकाबंदी करण्यात आली होती. या कारवाईत नंदुरबार शहर 456 कारवाया 90 हजार 900 रूपये दंड, नंदुरबार तालुका 164 कारवाया 32 हजार 800 दंड, उपनगर पोलीस ठाणे 100 कारवाया 20 हजार दंड, नवापूर पोलीस ठाणे 122 कारवाया 31 हजार 100 रूपये दंड, विसरवाडी पोलीस ठाणे 214 कारवाया 43 हजार 400 दंड, शहादा पोलीस ठाणे 146 कारवाया 29 हजार 200 रूपये दंड, सारंगखेडा पोलीस स्टेशन 230 कारवाया 45हजार 600 दंड, म्हसावद पोलीस ठाणे 130 कारवाया 26 हजार दंड, धडगांव पोलीस ठाणे 81 कारवाया 16 हजार 200 दंड, अक्कलकुवा पोलीस ठाणे 186 कारवाया 37 हजार 600 दंड, तळोदा पोलीस ठाणे 110 कारवाया 25 हजार 700 दंड, मोलगी 75 कारवाया 15 हजार दंड अशा एकूण 2 हजार 34 केसेस करण्यात आल्या असून त्यात एकूण 13 लाख 13 हजार 400 रूपये दंड वसुल करण्यात आला.

दरम्यान, दि.1 जानेवारी ते14 जानेवारी या कालावधी पोलीस दलाने जिल्ह्यात रेस्टॉरंट, उपहारगृहे व इतर आस्थापने तपासणी असता त्यात 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त नागरीक आढळून आले. कोविड नियमांचा भंग केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात 124 जणांविरूध्द 77 गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.

जिल्हाभरात सर्व पोलीस ठाण्याहद्दीत पोलीसांकडून नाकाबंदी करून कडक तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी शासनाने दिलेल्या कोविड नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com