नंदुरबारात कौटुंबिक अत्याचार जन जागृती मेळावा

नंदुरबारात कौटुंबिक अत्याचार जन जागृती मेळावा

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

कुटुंबातील मुलांवर (children) लहानपासूनच संस्कार (Rites) होणे आवश्यक असून संस्कार शिवाय परिस्थिती बदलणार (Things will change) नाही असे प्रखर मत शंकरलाल अग्रवाल यांनी मांडले.

आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेच्या वतीने नुकताच ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिवसानिमीत्त ज्येष्ठ नागरिक कौटुंबीक अत्याचार जन जागृती मेळावा घेण्यात आला. त्यात ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आई वडीलांनी देखील घरातील परिस्थिती लक्षात घेवून आपल्या आयुष्याचा उर्वरीत प्रवास समझोता एक्सप्रेसमधूनच करावा असे सांगुन समजदारी घेत आपल्या हयातीत मृत्युपत्र लीहुण ठेवून आपली चल व अचल संपत्तीचे शेवटपर्यंत मालक म्हणूनच रहावे असा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा.डॉ.आशा तिवारी यांनी सभेला संबोधित करतांना सांगीतले की, घर लहान असल्याचे कारण पुढे करून आई वडीलांना वृद्धाश्रमात स्थलांतरीत केल्याचे सांगणार्‍या मुलांच्या घरात अतिशय किमती काटेरी बोनसाय आणि कुत्रे पाळायला मात्र जागा असते. आई वडीलांच्या ऋणाची जाण न ठेवता, त्यांचा छळ करणार्‍या मुलांकडून दाद मागण्यासाठीच ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण कायदा 2007 अंमलात आल्याचे सांगूण या कायद्याविषयी बारीकसारीक तरतुरी अतिशय सोप्या भाषेत सांगुन, आई वडीलांशी कसे मुलांनी वागावे याचे धडे शाळेतूनच देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले.

कार्यक्रमाचे उद्घाटक किर्तीभाई चंदलाल शहा यांनी सभेला मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपली संस्कृती जोपासण्यासाठी नुसता कायदा करून भागणार नाही तर मुलांवर व तरूणांवर संस्कार करण्याची गरज असल्याचे सांगून ज्येष्ठांनी देखील आपल्या मुलांच्या संसारात हस्तक्षेप करू नये. शक्यतोवर स्वतःची कामे स्वतःच करण्याचा प्रयत्न करावा असा सल्लाही त्यानी दिला.

कार्यक्रमात डी. एस. बच्छाव, जगन्नाथ माळी, नंदुरबार आणि उखाभाउ पिंगळे तळोदा, मगनभाई मक्क पाटील-प्रकाशा यांनी खुल्या चर्चेत भाग घेवून आपले मनोगत व्यक्त केले. पितांबर पुंडलीक पवार, धुळे आणि सुदाम वळवी, सोनपाडा यांनी आपल्या मुलांकडून, हृदयाला हेलावून टाकणार्‍या आपबितीच्या घटना सांगीतल्या. तर रविंद्र मगरे तळोदा, गुलाबराव पाटील- खोंडामळी यांनी प्रमुख पाहुण्या प्रा.डॉ.आशा तिवारी यांच्याकडून, ज्येष्ठ नागरिक कायद्याविषयी आपल्या शंकाचे समाधान करून घेतले. सुत्रसंचलन आत्माराम चैत्राम इंदवे, प्रास्ताविक बारकू नवल पाटील व आभार प्रदर्शन डी. के. साळुखे यांनी केलेे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश दयाराम पाटील, माया पाटील, आशा गवळी, सागर गवळी, वसंत पाटील, आरविंद पाटील, कविता थोरात, राहुल पावार, निलम पाटील यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com