नंदुरबार जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी १ लाख ८ हजार २६ विद्यार्थ्यांची उपस्थिती

नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात शाळेची घंटा वाजली
नंदुरबार जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी  १ लाख ८ हजार २६ विद्यार्थ्यांची उपस्थिती

नंदुरबार | प्रतिनिधी - NANDURBAR

जिल्ह्यात(District) आजपासून इयत्ता पाचवी ते सातवीच्या (Fifth to seventh) शाळा (school) सुरु (Started) झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील (rural areas) ९१७ शाळांमध्ये १ लाख ५९ हजार ५०९ विद्यार्थ्यांपैकी ९५ हजार ७०५ विद्यार्थी उपस्थित (Students present) होते. तर शहरी भागातील (urban areas) १७८ शाळांमध्ये ३७ हजार ३३९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३२१ विद्यार्थी उपस्थित ((Students present)) होते.

ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्याबाबत शासन परिपत्रकान्वये निर्णय झालेला होता. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे व डॉ.युनूस पठाण यांनी नियोजन करून सर्व गटशिक्षणाधिकारी,

विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या साहाय्याने शाळा सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले. यात ग्रामीण भागातील ९१७ शाळांमधील १ लाख ५९ हजार ५०९ विद्यार्थी तसेच शहरी भागातील १७८ शाळांमधील ३७ हजार ३३९ विद्यार्थी शाळेत येतील यासाठी नियोजन करण्यात आले.

शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेतील १६० अधिकारी व कर्मचारी यांना ६१७ शाळा भेटी व तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले. कोव्हीड -१९ च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करुन शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सर्व विद्यार्थ्यांशी हितगुज करून मास्क, सॅनिटायझर देण्यात येऊन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण समारंभपूर्वक करण्यात आले. त्यानंतर त्यांना कोव्हीड -१९ रोगाबाबत जागरुकतेसाठी मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या .

राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरु केलेले माझा विद्यार्थी माझी जवाबदारी या उपक्रमाची अंमलबजावणी शाळास्तरावर करण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक मच्छिद्र कदम व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी नियोजन करून प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थी दत्तक देऊन आजपासून त्यांना नियमित शाळेत आणणे व त्यांच्या आरोग्याची दररोज तपासणी करीत राहणे यासारख्या बाबी पार पाडल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात शाळेच्या प्रथम दिनी ग्रामीण भागातील ९१७ शाळांमध्ये १ लाख ५९ हजार ५०९ विद्यार्थ्यांपैकी ९५ हजार ७०५ विद्यार्थी उपस्थित होते. एकूण ६ हजार ८५७ शिक्षकांपैकी ४ हजार ३१९ शिक्षक उपस्थित होते. एकूण शिक्षकेतर कर्मचारी ९७५ पैकी ६१४ कर्मचारी उपस्थित होते.

शहरी भागातील १७८ शाळांमध्ये ३७ हजार ३३९ विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ३२१ विद्यार्थी उपस्थित होते. एकूण शिक्षक कर्मचारी २ हजार ७९ पैकी ३०३ शिक्षक उपस्थित होते. एकूण शिक्षकेतर कर्मचारी ७२५ पैकी २२५ कर्मचारी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्यात पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम असल्याने निवडणूक कामकाजासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर असल्याने त्यांची उपस्थिती कमी आहे. माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी गुगल लिंक तयार करुन विद्यार्थी उपस्थितीचा आढावा सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेकडून मोबाईल फोन मार्फत घेतला.

शाळा शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा व पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी समाधान व्यक्त केले.

Related Stories

No stories found.