पिस्तुलचा धाक दाखवत पेट्रोल पंपमालकाला लुटण्याचा प्रयत्न

प्रतिकार करणारे पेट्रोल पंपमालक जखमी, तळोदा येथील घटना
पिस्तुलचा धाक दाखवत पेट्रोल पंपमालकाला लुटण्याचा प्रयत्न

मोदलपाडा l वार्ताहर नंदुरबार |nandurbar

तळोदा शहरात काल मध्यरात्री (Pistol) पिस्तुलचा धाक दाखवत (Petrol pump) पेट्रोल पंपचालकाला लुटण्याचा प्रयत्न झाला.दरम्यान या घटनेत पेट्रोल पंपचालक झाला असुन या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

तळोदा शहरातील मेन रोड येथे राहणार्‍या चेतन चंद्रवदन शहा यांचा मालकीचा महेंद पेट्रोल पंप आमलाड शिवारातील कंणकेश्वर मंदिराजवळ आहे . सदर पेट्रोलपंपावर चेतन शहा हे दररोज दिवसभरातील आलेले पैसे रात्री साधारण १२ ते १ वाजेचे दरम्यान घरी आणत असतात . नेहमीप्रमाणे चेतन शहा हे क्रेटा गाडी (क्रं.एम.एच.३९ ए.बी. २४५५) ने त्यांच्याकडे असलेले ७० हजार रुपये कापडी पिशवीत घेवुन साधारण रात्री १२ वाजेचे सुमारास तळोद येथे येण्यासाटी निघाले होते.

दरम्यान साधारण १२.१५ वाचेदरम्यान तळोदा येथील पोष्ट गल्ली येथील त्यांच्या घराजवळ येवून गाडी बंद करून पैशाची पिशवी घेवुन खाली उतरले असता अचानक त्यांच्या पाठीमागुन एक अनोळखी इसम आला व त्यांनी त्याच्याकडे असलेली पिस्टलचा (बंदुक) धाक दाखवत हातातील पैशाची पिशवी हिसकवु लागला त्यावेळी चेतन शहा यांनी पिशवीने प्रतिकार करून लोकांची मदत घेण्यासाठी थोड्या अंतरावर पुढे गेले असता तो चोरटा पुन्हा मागे येवुन त्याच्या हातातील पिस्टलचा बटने चेतन शहा यांच्या दोन्ही हाताला मारून दुखापत केली.

यावेळी श्री.शहा यांनी मोठ्याने ओरळल्याने व गल्लीत कोणीतरी येत असल्याचे त्याने पाहिल्याने तेथुन चोरट्याने पळ काढून थोड्या अंतरावर एक मोटारसायकल उभी असलेली त्यावर एक इसम बसलेला होता त्याचा सोबत बसुन तो पळून गेला. त्याचवेळेस गल्लीतील लोकांनी चेतन शहा ओरडल्याचा आवाज ऐकुन मयुर रमेश पाटील , प्रंशात प्रकाश गांधी , प्रकाश चंपालाल जैन, गौरव देवेंद्र वाणी व इतर लोक सदर ठिकाणी आले व त्याचवेळेस गल्लीतुन येणारा इसम मयुर पाटील यांनी े जवळ येवून सांगितले की, सदर मोटार सायकलवरील दोन इसम हे मेन रोड जातांना पाहिले व त्यांच्याजवळ असलेली मोटार सायकलचा (क्रं .८३९२) असा होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com