महसूल कर्मचार्‍याच्या अंगावर वाळूमाफीयांकडून ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयत्न

महसूल कर्मचार्‍याच्या अंगावर वाळूमाफीयांकडून ट्रॅक्टर चालविण्याचा प्रयत्न

तळोदा Taloda । ता.प्र.-

तालुक्यातील नळगव्हाण येथे गौणखनीज (Secondary minerals) पथकाच्या (squad) अंगावर वाळू माफियांनी (Sand mafias) ट्रँक्टर (Tractor) चालवण्याचा प्रयत्न करुन दमदाटी व शिवीगाळ केल्याची घटना घडली.

तालुक्यातील नळगव्हाण येथील नदीतून आज सायंकाळी एक ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्यात येत होती. यावेळी तळोदा येथील तहसिल कार्यालयातील महसूल विभागातील मंडळाधिकारी श्री.सरगस यांनी मज्जाव केला असता ट्रॅक्टर चालकाने त्यांना दमदाटी केली व ट्रॅक्टर अंगावर चालविण्याचा प्रयत्न केला. तसेच गुजरात राज्यात ट्रॅक्टरसह पळून गेले. याबाबत तळोदा पोलीसात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे, असे तहसीलदार गिरीष वखारे यांनी सांगितले. पोलिसांशी संपर्क केला असता अद्याप तक्रार दाखल केली नसल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com