मोटरसायकल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक

साडे तीन लाखाच्या 8 महागडया मोटरसायकली हस्तगत, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
मोटरसायकल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

मोटारसायकल (Motorcycle) चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगाराल स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 8 महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल (Motorcycle) चोरीचे गुन्हे दाखल असून बरेचसे गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नाहीत. मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले होते. पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आव्हान होते. त्याअनुषंगाने मोटरसायकल (Motorcycle) चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल (Motorcycle) चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी निर्देश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत चोरी झालेल्या मोटारसायकल (Motorcycle) चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची इत्यंभूत माहिती घेवून रेकॉर्डवरील, जेलमधुन सुटुन आलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवून होते.

दि.26 एप्रिल 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार नंदुरबार शहरात गस्त करीत असतांना नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांना भोणे फाटा भागात दोन इसम कमी किंमतीत मोटरसायकल विकत आहेत अशी बातमी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथके तयार केली. पथकाने तात्काळ भोणे फाटा परीसरात जावून खात्री केली असता एका पान टपरी जवळ दोन इसम एका विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह दिसून आले. पथक त्यांच्याकडे जात असतांना त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन्ही संशयीत इसम मोटारसायकल तेथेच सोडून पळून गेले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयीत इसमास पाठलाग करुन ताब्यात घेतले. दुसरा इसम पळून जाण्यात यशस्वी झाला. खोजल्या वण्या तडवी रा.बिजरीगव्हाण ता.अक्कलकुवा ह.मु.तळोदा कणकेश्वर मंदीर असे ताब्यात घेतलेल्या चोरटयाचे नाव आहे. युनिकॉर्न मोटरसायकल (Motorcycle) ही त्याने व त्याचा चुलत भाऊ सुग्या सन्या तडवी अशांनी काही महिण्यापुर्वी गुजरात राज्यातून चोरुन आणल्याचे सांगितले. सदर 50 हजाराची मोटरसायकल ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याने व त्याचा चुलत भाऊ सुग्या सन्या तडवी याच्या मदतीने नंदुरबार शहर, तळोदा व गुजरात राज्यातून मागील काही दिवसांमध्ये दुचाकी मोटारसायकल चोरी करुन आणल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध कंपनीच्या 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 8 महागड्या मोटार सायकली कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आल्या आहेत.

त्यांच्याकडून 25 हजाराची काळया रंगाची स्पलेंडर मोटर सायकल (क्रमांक एमएच39-एस-2702) 20 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल, 45 हजार रुपये किंमतीची काळया रंगाची बजाज पल्सर 125 सीसी डीटीएस-1 मॉडेलची (जीजे-26-सी 7734), 75 हजाराची यामाहा कंपनीची काळया रंगाची मोटर सायकल क्रमांक जीजे-16-सीआर-3135, 50 हजाराची काळया रंगाची होंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची रंगाची मोटर सायकल, 50हजार रुपये किंमतीची काळया रंगाची होंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची मोटर सायकल (क्रमांक जीजे-21-एन-9231), 40 हजार रुपये किंमतीची राखाडी रंगाची होंडा कंपनीची सीबी शाईन मोटर सायकल (क्रमांक जीजे-22-एफ-9454), 30 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्पलेंडर प्लस मॉडेलची मोटर सायकल (क्रमांक एमएच 39-ई-5048) अशा एकुण 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 8 महागड्या मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच गुजरात राज्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस करण्यात आलेले आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी खोजल्या वण्या तडवी याच्याविरुध्द यापुर्वी 23 मालमत्तेविरुध्दचे गुन्हे नंदुरबार, धुळे, जळगांव व गुजरात राज्यात दाखल आहेत.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी, पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, विशाल नागरे, बापू बागुल, रमेश साळुखे, अभय राजपुत यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.