आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍याला अटक

आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍याला अटक

नंदुरबार ।Nandurbar। प्रतिनिधी

व्हॉटस् अ‍ॅपवर (WhatsApp) आक्षेपार्ह पोस्ट (offensive posts) प्रसारीत करणार्‍या नंदुरबार येथील व्यापार्‍याविरुध्द (Against traders) भारतीय दंड संहीता व माहिती तंत्रज्ञान अधिनियम (Information Technology Act) 2000 (आयटीसीटी 2000) प्रमाणे गुन्हा (crime) दाखल करण्यात आला असून त्याला अटक (Arrested) करण्यात आली आहे.

दि.28 एप्रिल 2022 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील व्यापारी (traders) राकेश कुंजबिहारी शाह या व्हॉट्सऍ़प (WhatsApp) वापरकर्त्याने SHREE MIRCHI या व्हॉट्सअप गृपवर त्याच्या मोबाईलवरुन एका विशिष्ट समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जावून दोन धर्मात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा मजकुराचा संदेश (offensive posts) टाकला.

याबाबत प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सायबर सेल यांना सदर बाब सांगून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. रविंद्र कळमकर यांनी संशयीत इसमास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशीत केले. त्याअनुषंगाने संशयीत इसम राकेश कुंजबिहारी शाह (वय-50, धंदा-मिरची व्यापारी, रा.प्लॉट नं.18, एमएल टाऊन, नंदुरबार) यास ताब्यात घेतले.

त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता SHREE MIRCH या व्हॉट्सऍ़प गृपवर विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जावून दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करणारा संदेश प्रसारीत केला होता. तसेच त्याने त्याचे मोबाईलमधील इतर 3 व्हॉट्सऍ़प गृपवर सदरचा संदेश (offensive posts) प्रसारीत केला असल्याचे दिसून आले. त्याचा मोबाईल जप्त करुन त्याच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 295 (अ) व माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम 67 प्रमाणे गुन्हा (crime) दाखल करुन त्यास अटक करण्यात करण्यात आली आहे. त्याला पोलीस कोठडी (Police cell) सुनावण्यात आली आहे. हा संदेश कोठुन आला? व्हॉट्सऍ़प गृपचे अ‍ॅ़डमिन कोण आहेत, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संदीप पाटील, पोलीस नाईक कन्हैया पाटील, हितेश पाटील, राकेश मोरे, मोहन ढमढेरे,रामेश्वर चव्हाण, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.

फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉट्सऍ़प, ट्विटर व इतर सोशल मिडीयावर धार्मीक भावना भडकविणार्‍या, दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणार्‍या व खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आक्षेपार्ह व्हिडीओ, पोस्ट प्रसारित करतांना कोणीही आढळून आल्यास त्याच्याविरुध्द् तसेच संबंधित अ‍ॅ़डमिनवर कठोर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच आक्षेपार्ह मजकुराबाबत माहिती प्राप्त झाल्यास त्वरीत नजिकच्या पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार येथे देण्यात यावी असे आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार (Superintendent of Police Vijay Pawar) यांनी आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.