अरेच्च्या..ग्रा.पं. निवडणूक प्रचारासाठी आता बार्जचाही आधार

अरेच्च्या..ग्रा.पं. निवडणूक प्रचारासाठी आता बार्जचाही आधार

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

अक्कलकुवा (Akkalkuva) धडगाव (Dhadgaon) तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Elections) धामधूम सुरू असून या निवडणुकीसाठी प्रचाराचा (propaganda) वेग वाढला आहे.नर्मदा काठावरील (banks of the Narmada) गांवमध्ये (village) ग्रामपंचायत निवडणूक प्रचारासाठी बार्जचा (Barge base for promotion) आधार घ्यावा लागत आहे.

अक्कलकुवा व धडगाव हे अतिदुर्गम तालुक्यात वसलेले तालुके आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींची निवडणूक याच परिसरात असल्यामुळे प्रचार करताना उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे. अक्कलकुवा तालुक्यात 44 तर धडगाव तालुक्यात 25 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. तालुक्यांमध्ये सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया ही अतिदुर्गम भागात असल्याने या ठिकाणी रस्त्या अभावी उमेदवार व कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे.

अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात अति दुर्गम भागातील नर्मदा किनार्‍यावर असलेल्या ग्रामपंचायतींची देखील निवडणूक सुरू आहे या परिसरात पुरेसे रस्ते नसल्याने तसेच सरदार सरोवर प्रकल्पामुळे नर्मदा नदीच्या पाण्यात झालेली वाढ आणि त्यामुळे पाण्याला आलेला फुगवटा यामुळे पाड्यापाड्यांमध्ये असलेले अंतर वाढले आहे.

परिणामी निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांना बार्ज, छोट्या होडी, डूंगे यांचा सहारा घेऊन प्रचार करावा लागत आहे. काही ठिकाणी सकाळपासुन कार्यकर्ते पायपीट करीत आहेत.त्यामुळे अक्कलकुवा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा जोर चढला आहे. नर्मदा काठी असलेल्या गावात जाण्यासाठी बार्जचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र नर्मदा काठांवरील गावात दिसत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com