ॲपेरिक्षाची मोटारसायकलला धडक ; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ; पत्नी व मुलगा जखमी

ॲपेरिक्षाची मोटारसायकलला धडक ; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ; पत्नी व मुलगा जखमी

नवापूर l प्रतिनिधी Navapur

नवापूर तालुक्यातील रायंगण गावालगत असलेला राष्ट्रीय महामार्ग (National Highways) क्रमांक सहावरील पुलाच्या वळणावर (Hotel) हॉटेल सुरजी समोर (Sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Kudal Police Station) कुडाळ पोलीस स्टेशन येथील कार्यरत पोलीस कर्मचारी यांच्या मोटारसायकलीला समोरून येणाऱ्या लाईट बंद असलेल्या ॲपेरिक्षा जोरदार धडक दिली या धडकेत मोटारसायकलवरील पती-पत्नी व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले.

या (accident)) अपघातात मोटार सायकल चालक पोलीस कर्मचारी यांचा गंभीर अवस्थेत जागीच मृत्यू झाला.

नवापुर तालुक्यातील रायंगण गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शहरातील तीन टेंबा येथील आपल्या सासरवाडीतुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दिनकर पाडवी हे मोटार सायकलने आपल्या पत्नी व मुलासह आपल्या गावी जात असताना समोरून येणाऱ्या लाईट बंद असलेल्या ॲपेरिक्षाने दिनकर पाडवी यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात दिनकर पाडवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी ज्योती दिनकर पाडवी यांच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. त्यांना (gujrat) गुजरात राज्यातील व्यारा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व दीड वर्षाच्या मुलगा जयेश पाडवी या किरकोळ जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच वावडी गावचे निलेश गावित, पंकज गावित, हिरण वसावे, अनमोल गावीत यांनी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करीन जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.नवापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 304(अ),279,337,338 सह मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील करीत आहेत.

Related Stories

No stories found.