
नंदूरबार Nandurbar l प्रतिनिधी
अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील काठी संस्थानची (Kathi Sansthan) मानाची रजवाडी होळी (Manachi Rajwadi Holi) पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली. रात्रभर पारंपारिक पद्धतीने आदिवासी नृत्य (Tribal dance) करुन आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे (culture) दर्शन घडवले. पहाटे ६ वाजेच्या सुमारास मानाची रजवाडी होळी पेटविण्यात आली.
अक्कलकुवा तालुक्यात असलेल्या काठी संस्थानच्या रजवाडी होळीला (Rajwadi Holi) सातपुड्यात विशेष महत्व आहे. सदर होळी पहाटे पेटविली जाते. काठी येथील होळी पेटविण्याचा मान काठी संस्थानिकांचे वारस असलेल्या महेंद्रसिंग पाडवी (Mahendrasingh Padvi) यांना आहे. ही होळी पाहण्यासाठी जिल्हयातूनच नव्हे तर इतर जिल्हे, परराज्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. रात्रभर पारंपारिक आदिवासी नृत्य करण्यात आले. समुहनृत्याचे आगळेवेगळे दर्शन यावेळी घडले.
काठीला जाणार्या रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी झाली होती. यावेळी समृहनृत्य (Memorial dance) करतांना आदिवासी दिसत होते. काली, बाबा आणि बुध्या ही तीन पात्रे यात पहायला मिळतात. होळीच्या काळात आदिवासी समाजात नवस फेडण्याची प्रथा (practice of paying vows) आहे. या काळात नवस फेडणारी आणि व्रत करणारी व्यक्ती घरचे अन्न ग्रहण करीत नाही. आसपासच्या घरांमधून वा गावातून मागून आणलेले अन्न खाते, खाटेवर किंवा पलंगावर झोपत नाही. पाण्याचा स्पर्श होवू देत नाही. होळी पेटेपर्यंत त्यांचे नाचणे व गाणे ही दिनचर्या सुरू असते. यावेळी नवस फेडणार्या भाविकही मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
काठी येथील होळीचा खड्डा (Holi pit) सामुहिकपणे हाताने खोदण्याची प्रथा आहे. यासाठी प्रत्येकाने होळीच्या ठिकाणी जावून मुठभर माती काढली. सायंकाळपासून हा खड्डा खोदण्यास सुरुवात होत असते. त्यातूनच होळीचा दांडा (Holi stick) उभारण्यासाठी खड्डा तयार करण्यात आला. पहाटेच्या सुमारे १०० फुट उंचीचा बांबूचा दांडा त्या खड्डयात उभारण्यात आला.
होळी पेटविण्यापुर्वी विधीवत पूजा (Worship) करण्यात आली. पानाफुलांनी सजवलेला बांबू खड्डयात उभा करण्यात आला. आजुबाजूने लाकडाच्या ओंडक्यांचा आधार देण्यात आला. त्यानंतर आदिवासी बांधवांनी होळीभोवती फेर धरून पारंपारीक नृत्य (Traditional dance) केले. नृत्य करणार्या आदिवासी बांधवांच्या हातात धार्या, तिरकामटे, कुर्हाड, बर्ची तसेच विविध प्राण्यांचे मुखवटे लावण्यात आले होते. हातामध्ये ढोल, पिपरी, पावरी,बासरी आदी वाद्यांनी परिसर दुमदुमून गेला होतायावेळी माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी, जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्यासह अधिकारी, राजकीय कार्यकर्ते, पुढारी, आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.