चरणमाळ घाटात पुन्हा अपघात, कांद्याचा ट्रक उलटल्याने चालक ठार

सहचालक जखमी
चरणमाळ घाटात पुन्हा अपघात, कांद्याचा ट्रक उलटल्याने चालक ठार

नवापूर | श.प्र. navapur

तालुक्यातील चरणमाळ घाटात अपघातांची मालिका सुरुच आहे. आज दि. ५ नोंहेंबर २०२२ रोजी नामपूर (मालेगाव) येथून कांद्याचा ट्रक घाटाच्या खाली आला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर सहचालक जखमी झाला आहे.

आज दि.५ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नामपूर (मालेगाव) येथून कांदा भरुन गंगापूर (राजस्थान) येथे जात असतांना चरणमाळ घाटाच्या वळणावर ट्रक (क्रमांक आरजे २१.जीसी ४७७१) या वाहनाचा ब्रेक न लागल्यामुळे काद्याचा ट्रक घाटाच्या खाली आला. यात ट्रक चालक हनुमान मोहनराम जाखळ (रा.बिकानेर राजस्थान) हा मयत झाला. सहचालक पुनमचंद गेनाराम सारंग (रा. बिकानेर राजस्थान) याने ट्रकमधून उडी मारल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.

चरणमाळ घाटात अपघाताची मालिका सुरु असून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या ठिकाणी बोरझर गावातील पोलिस पाटील भिमा दावजी गावीत व बोरझर गावाचे ग्रामसुरक्षा दल यांनी घटनास्थळी मदत केली.घटनेची माहिती सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांना मिळताच घटनास्थळी भेट देवून उपनिरीक्षक मनोज पाटील, शाम पेढारे, गणेश बच्छे, प्रतापसिंग वसावे यांनी घटनेचा पंचनामा केला. मयत चालकाला १०८ रुग्णवाहिकेने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com