... आणि म्हणून तळोद्याचा आदिवासी प्रकल्प राज्यात ठरला अव्वल

अलिविहिर येथील शासकीय आश्रम शाळेत ६४५ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप
... आणि म्हणून तळोद्याचा आदिवासी प्रकल्प राज्यात ठरला अव्वल

चेतन इंगळे

मोदलपाडा ता.तळोदा | वार्ताहर -NANDURBAR

अलिविहिर येथील शासकीय आश्रम शाळेत (Ashram School) आदिवासी प्रकल्प (Tribal Project) मार्फत विविध दाखल्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ६४५ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले (caste certificates) वाटप करण्यात आले. दरम्यान तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी (students) हा उपक्रम राबवून राज्यात अव्वल ठरला आहे. तसेच प्रकल्पाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पुढील शैक्षणिक वर्षासाठी जातीचे व तत्सम दाखले आदिवासी (Tribal) विद्यार्थ्यांना (students) लागत असतात.तथापि हे दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व त्यांचा पालकांना कागद पत्रांची पूर्तता करताना मोठी दमछाक होते.यात त्यांचा वेळ व पैसा देखील खर्च होत असतो.तरीही काही वेळेस यंत्रणांच्या उदासीन धोरणामुळे वेळेवर मिळत नाही.

ही पार्श्वभूमी लक्षात घेवून येथील आदिवासी विकास प्रकल्पाने आपल्या न्युक्लिअस बजेट (Nucleus budget) मधून आपल्या अखत्यारीत असलेल्या शासकीय आश्रम शाळामधील ((Ashram School)) विद्यार्थ्यांना जातीचे दाखले व आधार अपडेट्स करून देण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.त्यामुळे तळोदा तालुक्यातील आलिविहिर येथे शिबीर आयोजीत केले होते.

या शिबिरात साधारण ६४५ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले. हे दाखले प्रकल्प अधिकारी (Project Officer) डॉ मैनेश घोष (Dr. Manesh Ghosh) यांच्या उपस्थित देण्यात आले.या वेळी प्रकल्प अधिकारी डॉ घोष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले शासनाने आदिवासी विकास प्रकल्प मार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधी मंजूर केला आहे.

त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात येतील.त्यासाठी आता फिरफिर करावी लागणार नाही.शिवाय हे दाखले त्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी देखील कामात येतील.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन सहायक प्रकल्प अधिकारी (Assistant Project Officer) सुवर्णा सोलंकी (Suvarna Solanki) यांनी केले होते. शिबिरास सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे,अधीक्षक, मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.शिबिर यशस्वीतेसाठी प्रांत कार्यालयातील नेट वर्क अभियंता वाल्मीक पाटील व संगणक संचालक यांनी परिश्रम घेतले होते.

डीबीटी योजनेची अडचण होईल दूर

सदर शिबिरात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड (Aadhaar card) देखील देण्यात आले आहे.शिवाय अपडेट्स ही करून देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेसाठी येणारी अडचण दूर होणार आहे. आधार कार्ड अपडेट्स शिवाय विद्यार्थ्यांचे बँक (bank) खाते केवायशी जोडले जात नव्हते.परिणामी गणवेश व इतर साहित्याची रक्कम सुध्दा विद्यार्थ्यांना मिळत नव्हती.आता आधारही अपडेट्स झाल्याने विद्यार्थ्यांची ही प्रमुख अडचण दूर झाली आहे.दरम्यान राज्यातून एकमेव तळोदा आदिवासी विकास प्रकल्प मार्फत शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रकल्प कार्यालयाचे आदिवासी विकास विभगाने कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com