... आणि म्हणून नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव

नंदुरबार पालिकेच्या सभेतील ठराव जिल्हाधिकार्‍यांना सादर
... आणि म्हणून नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी-

येथील नगरपालिकेच्या (municipality) मुख्याधिकार्‍यांच्या (chief officer) दालनात असभ्य वर्तणूक (Rude behavior) करुन खुर्च्यांची तोडफोड (Breaking of chairs) करणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या (Bharatiya Janata Party) नगरसेविकेच्या मुलावर (son of a corporator) कायदेशीर कारवाई (Legal action) करावी, व असभ्य वर्तन करणार्‍या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द (Unsubscribe) करावे, असा ठराव करीत सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षांसह (mayor of the ruling group) सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी (Collector) यांच्याकडे दाखल केला आहे.

याबाबत काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार नगरपरिषदेच्या कार्यलयात विरोधी पक्षाचे नगरसेवक कार्यालयीन वेळेत कार्यालयात येवून धुमाकुळ घालत असतात. यापूर्वी सुध्दा नंदुरबार नगरपरिषदे मुख्याधिकारी गणेश गिरी असतांना नगरसेविकेचे पुत्र लक्ष्मण माळी व विरोधी नगरसेवक यांनी खुर्च्यांची नासधुस केली होती.

आता दि. 20 ऑक्टोंबर 2021 रोजी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत नगरसेविकेचा पुत्र लक्ष्मण माळी व इतर नगरसेवकांनी खुर्च्या तोडून आरडाओरड केली तसेच शिवीगाळ केली. मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे हे याघटनेचे साक्षीदार असून त्यांच्या दालनातील तसेच नगरपालिकेतील सी.सी.टी.व्ही . कॅमेर्‍यातून सुध्दा याघटनेचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही.

त्यामुळे नगरपरिषदेमध्ये शिवीगाळ करणार्‍या, दादागिरीची भाषा करणार्‍या सिंधुताई माळी, त्यांचा मुलगा लक्ष्मण माळी तसेच नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घ्यावा व असभ्य वर्तवणूक करणार्‍या नगरसेवकांचे सदस्यत्व कमी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी केली. या निवेदनावर उपनगराध्यक्ष रवींद्र अशोक पवार, प्रमोद ओंकार शेवाळे, मेमन मनसा अगली, कुरेशी फहमीदा बानो दियाम , परवेज करामत खान यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

दरम्यान, निवेदनाची दखल घेत नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी लगेचच हा ठराव मंजूर करून नगरसेवकांसमवेत जाऊन भेट जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना सदर मंजूर झालेला ठराव सादर केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com