अन.. आश्रमशाळेची विहिर हरवली

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील घटना, जि.प.सदस्यांची स्थायी सभेत संतप्त प्रतिक्रीया
अन.. आश्रमशाळेची विहिर हरवली

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आश्रमशाळेसाठी (Thanepada Ashram School) पाणी पुरवठा करणारी (Water supplier) विहिर हरवण्याची (lose the well) घटना घडली आहे. हा प्रताप चक्क पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता (Executive Engineer, Water Supply Department) श्री.बाविस्कर यांनी केला आहे.त्यांनी विहिर खोदण्यात आली. मात्र त्यास पाणी लागले नसल्याचा अभिप्राय संबंधित इतिवृतात नोंदविला होता.मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी विहिरच खोदण्यात आली नसून खोदकाम झाले नाही तर पाणी लागणार कसे? असा संतप्त सवाल जि.प.सदस्यांनी उपस्थित केला.

नंदुरबार जि.प.ची स्थायी समिती सभा जि.प.च्या याहामोगी सभागृहात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत, सभापती गणेश पराडके, अजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

सभेदरम्यान जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी यांनी सांगीतले की, सुरवाणी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट दिली असता त्या ठिकाणी शिक्षक, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत, ते गैरहजर आढळून येतात. तसेच कोणीही जबाबदार कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. वस्तीगृहात भेट दिल्यावर 18 विद्यार्थिनी आजारी असल्याचे दिसून आले. त्यानंतर आपण स्वत: जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ तालुका आरोग्याधिकारी धडगाव यांच्यामार्फत आरोग्य पथक पाठवून विद्यार्थिनींवर उपचार करण्यात आला. सदर वस्तीगृहात व विद्यालयात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची गंभीर तक्रार रतन पाडवी यांनी यावेळी केली.

दरम्यान, याबाबत प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सतिष चौधरी यांनी त्याठिकाणी भेट न दिल्याने जि.प.पदाधिकार्‍यांनीं नाराजी व्यक्त केली. तसेच सदरच्या वस्तीगृहात अस्वच्छता दिसून येते. तक्रार केल्यानंतर देखील शिक्षणाधिकार्‍यांनी याची दखल न घेतल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिक्षक नसणार्‍या शाळांमध्ये शिक्षक नेमण्यात यावे, अधिकचे शिक्षक असतील त्यांना वर्ग करण्यात यावे, पडक्या शाळांच्या इमारती तात्काळ निर्लेखित करण्यात याव्या, अशा सुचना जि.प.सदस्यांनी मांडल्या.

दरम्यान अंगणवाडी भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, असा जिल्हा परिेषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव झाला असतांनाही त्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी धडगाव परिसरात यामुळे हाणामार्‍या होत असून अनेकदा वाद होतात. यामुळे सदरची बाब गांभीर्याने घेण्याची मागणी जि.प.सदस्य विजय पराडके यांनी केली. यावर महिला बालकल्याण अधिकारी कृष्णा राठोड यांनी शासन निर्णयात पाडा असा शब्दप्रयोग नसल्याने त्याचा समावेश करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती दिली. यावर विजय पराडके यांनी सदरची बाब गांभीर्याने घेतली नाही आणि वाद उद्भवला तर मृतदेहच कार्यालयात ठेवणार असल्याचा इशारा दिला.

यावेळी सभेदरम्यान पाणी पुरवठा विभागाचा आढावा सादर केला जात असतांना ठाणेपाडा आश्रमशाळेसाठी पाणी पुरवठा करणारी विहिर खोदण्यात आली. मात्र त्यास पाणी लागले नसल्याचा अभिप्राय संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.बाविस्कर यांनी इतिवृतात नोंदविला होता. यावर जि.प.सदस्य देवमन पवार यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी विहिरच खोदण्यात आली नसून खोदकाम झाले नाही तर पाणी लागणार कसे? असा सवाल उपस्थित केला. यावर श्री.बाविस्कर यांनी सदस्यांच्या प्रश्नाला बगल देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभागृहात खोटी माहिती दिल्याने संबंधित अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी जबाबदार अधिकारी अशी उत्तरे देवू लागले तर जिल्ह्याचा विकास कसा होणार? असा सवाल जि.प.सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. यावर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सभागृहातील लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करण्यात यावा, सभागृहाची दिशाभूल करु नका, प्रत्येक विभाग प्रमुखाने स्वत: खात्री करुन मगच अहवाल सादर करा, कागदी घोडे नाचवू नका अशा सूचना दिल्या.

जिल्हा परिषेदेतर्फे पावणे पाच लाख तिरंग्यांचे नियोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातही हर घर तिरंगा, अमृत महोत्सव दौड आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हर घर तिरंगा उपक्रमासाठी जिल्हा परिषेदेतर्फे पावे पाच लाख तिरंग्यांचे नियोजन करण्यात आल्याचे जि.प.स्थायी सभेत सांगण्यात आले.दरम्यान योत ग्रामीण भागात 3 लाख 35 हजार,शहरी भागात 65 हजार व शासकीय विभागासाठी 55 हजार तिरंग्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यासह विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com