
नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील शिर्वे ते राणापूर रस्त्यावर शेती हिस्से वाटणी व भांडणाची (quarrel) कुरापत काढून गुप्तीने 70 वर्षीय वृद्धेच्या (old woman) गळ्यावर वार करुन खून (murder)केल्याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील शिर्वे येथील रेमूबाई विजेसिंग राऊळ व अशोक बहादूर राऊळ यांच्यात शेती हिस्से वाटणी वाद होता. शिर्वे गावाच्या शिवारातील शिर्वे ते राणापूर रस्त्यावरील लालू पाडवी यांच्या शेतातील चारा काढण्यासाठी रेमूबाई विजेसिंग राऊळ व विलास अर्जुन राऊळ हे रस्त्यावरुन जात होते. यावेळी अशोक बहादूरसिंग राऊळ याने दुचाकी थांबवून शिवीगाळ केली व माझ्याविरुद्ध केस करता असे रागाने सांगत दुचाकीच्या सिटजवळून गुप्ती काढून रेमूबाई राऊळ यांच्या गळ्यावर, दोन्ही हाताच्या कोपर्यावर, दोन्ही पायावर व बरगडीवर वार करुन त्यांचा खून केला.
याबाबत विलास राऊळ यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अशोक राऊळ याच्याविरोधात भादंवि कलम 302, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पंडीत सोनवणे करीत आहेत.