नवापूर येथे भीषण अपघातात विश्रामगृहातील कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू

नवापूर येथे भीषण अपघातात विश्रामगृहातील कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू

नवापूर Navapur। श.प्र.

शासकीय विश्रामगृह (rest house) येथील कार्यरत कर्मचारी (employee) हेमंत किसन जाधव यांचा मोटर सायकल अपघातात (tragic accident) दुर्दैवी मृत्यू (died) झाल्याची घटना घडली आहे .

नवापूर सोंनगढ दरम्यान गुजरात राज्यात मिरकोट गावा लगत अज्ञात वाहनाने (unknown vehicle) दुचाकी (Two-wheeler) (एम.एच.39,एम 4412) ला धडक दिली होती. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी चे अक्षरशः दोन तुकडे झाले.

उच्छल पोलिसांनी (police) हेमंत जाधव यांच्या मोबाईल वरून नवापूर येथे संपर्क साधत दि 3 रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताची माहिती दिली होती भीषण अपघातात (accident) दुचाकी स्वार नवापूर येथील शासकीय विश्राम गृह सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी हेमंत किसन जाधव (वय 53) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला.

हेमंत किसन जाधव हे अगदी मनमिळावू स्वभावाचे व अनेक वर्षा पासून शासकीय विश्राम गृहात सेवा देण्याचे काम करत होते.त्याचा अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com