तळोदा पालिकेच्या कचरा डेपोजवळ घाणीचे साम्राज्य

तळोदा पालिकेच्या कचरा डेपोजवळ घाणीचे साम्राज्य

तळोदा ।Taloda । ता.प्र.

येथील चिनोदा चौफुलीजवळील असलेल्या पालिकेच्या (municipality) कचरा डेपोला गेट (Garbage depot gate) नसल्याने नेहमीच कुत्रे, वराह, गुरेढोरे (Cattle) अचानक पळतं रस्त्यावर येवून (Coming to the street) अनेकवेळा छोटेमोठे अपघात (accident) झाले आहेत. पालिकेने या ठिकाणी त्वरीत गेट बसवण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे.

तळोदा येथील चिनोदा चौफुलीजवळील कचरा डेपोचे गेट तुटून वर्ष लोटले. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सदर ठिकाणी गेट बसविण्यात आले नाही. या ठिकाणी चौफुली असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी नेहमीच कुत्रे, वराह, गुरे यांचा मुक्तसंचार असतो.

तेथील घाणीच्या कचरा रस्त्यावर येऊन पसरलेला असतो तर कधी कधी मेलेली जनावरे, प्लास्टिकच्या पिशव्या, रद्दी झालेले कागद, घाण कपडे, गोणपाट आदी या मोकाट जनावरांकडून भर रस्त्यावर आणले जातात. त्यामुळे सदर रहिवासी परिसरात दुर्गंधी पसरुन तेथील रहिवाशांच्या आरोग्याच्या प्रश्नही सतत ऐरणीवर आहे.

आधीच पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेने आंधळ्याची भुमिका न घेता सदर कचरा डेपोवर गेट बसविण्याची मागणी शहरवासीयांसह चिनोदा, रांझणी, प्रतापपूर, कोठार आदी भागातील वाहनचालकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com