
तळोदा | श.प्र. TALODA
दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या प्रकाशा (Prakash) येथे पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम (Excavated) सुरू असताना एक पुरातन मूर्ती (Ancient idols) सापडली. ही मूर्ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज स्थानिक नागरिक आणि इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. मूर्ती सापडल्यानंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली असून याची माहिती पुरातत्व विभागाला (Department of Archaeology) देण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशाची ओळख दक्षिण काशी म्हणून आहे. या ठिकाणी अनेक वेळा खोदकाम करताना पुरातन वस्तू सापडल्या आहेत. पाण्याच्या टाकीसाठी खोदकाम सुरू असताना या ठिकाणी एक पुरातन मूर्ती सापडली.
ती दहाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही मूर्ती ध्यानस्थ अवस्थेत असून तिच्या चारही हातात आयुधे आहेत. त्यामुळे ही मूर्ती नेमकी कोणत्या देवाची हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात गावातील काही नागरिकांनी पुरातत्त्व विभागाशी संपर्क केला असून पुरातत्त्व विभागाचे अधिकारीही या ठिकाणी भेट देणार आहेत.
नागरीकांची पुजेसाठी गर्दीगावकरी आणि परिसरातील नागरिकांनी मूर्ती ज्या ठिकाणी सापडले. त्या ठिकाणी पूजा करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी मूर्ती ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणी मंदिर उभारण्याचा निर्धार केला.
प्रकाशा या ठिकाणी हडप्पा संस्कृतीशी साम्य असलेल्या अनेक पुरातन वस्तू सापडत असतात. पुरातत्त्व विभागाने प्रकाशा परिसरात उत्खनन करून या ठिकाणी सापडणार्या वस्तू कोणत्या शतकातील आहेत, याचा अभ्यास करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.