विधान परिषदेसाठी आमशा पाडवी यांची लॉटरी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुंबईत दाखल
विधान परिषदेसाठी आमशा पाडवी यांची लॉटरी

नंदुरबार | Nandurbar | प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आमशा पाडवी (Shiv Sena district president Amsha Padvi) यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. श्री. पाडवी हे मुंबईत असून जिल्ह्यातील काही शिवसेना नेतेही मुंबईकडे रवाना झाले आहेत.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हाध्यक्ष आमशा पाडवी ((Shiv Sena district president Amsha Padvi)) यांना संधी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी श्री. पाडवी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. यासोबतच नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदाराचे खाते उघडनार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com