
नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या (Independence) अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsava) नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे (Nandurbar District Police Force) अमृत महोत्सव दौड (AAmrit Mahotsav Race) व वृक्षारोपण (Tree Plantation) कार्यक्रम संपन्न झाला.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आज जिल्ह्यातील नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे वृक्षारोपण, हर घर तिरंगा, अमृत महोत्सव दौड आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, विश्वास वळवी, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक सुनिल नंदवाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री तसेच पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत फलकांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अमृत महोत्सव दौड हा कार्यक्रम आयोजीत केला असून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दि.21 जुलै 2022 ते दि.14 ऑगस्ट 2022 या दरम्यान जिल्ह्यात 75 कि.मी.चे अंतर धावणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून नंदुरबार ते उमर्दे खुर्द या दरम्यान आज ही 5 कि. मी. दौड करण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सदर दौडला सुरुवात करण्यात आली.
सदर दौडमध्ये जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील हे स्वत: सहभागी झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह जिल्ह्यातील इतर 15 पोलीस अधिकारी व 50 पोलीस अंमलदार देखील सहभागी झाले होते.
सदर दौडने पहिला टप्पा हा नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथून सुरु होऊन 5 कि.मी. अंतरावर असलेल्या उमर्दे खुर्द गावापर्यंत पुर्ण करण्यात आला. उमर्दे खुर्द गावात दौड पोहोचल्यानंतर गावातील प्रतिष्ठीत नागरिक व विद्यार्थ्यांनी फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून स्वागत केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उमर्दे खुर्द गावातील जि.प.शाळेतील झाडांकरीता ठिबक सिंचन व सिताराम पाटील यांनी वॉटर फिल्टर उपलब्ध करुन दिल्याबद्दल देविदास साळवे व सिताराम पाटील यांचे जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सत्कार करुन त्यांचे अभिनंदन केले.
दौड संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या घरावर भारतीय राष्ट्रध्वज लावून हर घर तिरंगा, अमृत महोत्सव दौड तसेच वृक्षारोपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अधिकार्यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत 75 कि.मी. अमृत महोत्सव दौड नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत धावण्यात येईल असे श्री.पाटील यांनी सांगितले.
यावेळी उमर्देचे सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर मराठे, ग्रामसेवक भरत गुले, तलाठी सूर्यवंशी, ग्रा.पं.सदस्य श्रावण पाटील, कैलास वळवी, दामा भिल, पोलीस पाटील दिलीप चौधरी, शिपाई रवींद्र साळवे, भगवान रावळे, न्यू ईग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र कदमबांडे, शिक्षक वर्ग तसेच जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख वसंत पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र बागुल, शिक्षक वर्ग, मल्हारी कदमबांडे, रामभाऊ बेंद्रे, जयंत गागरे, कृष्णा बोरणे, रमेश कुटे, रमेश पेटकर, निंबा बेंद्रे, विलास चौधरी, सिताराम बोराणे, रवींद्र कदमबांडे, विलास वळवी, फुलसिंग ठाकरे, गोविंद जगताप, वेडू जाधव, सुरेश जाधव, रमेश पेटकर, किशोर राजपूत, मुरलीधर बोराणे, राजाराम बोराडे आदी उपस्थित होते.