लोणखेडा येथील नारायणपूरम तीर्थ येथे अमृत भक्ती सत्संग महोत्सव

१८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान विविध कार्यक्रम , श्री लोकेशानंद महाराजांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रीगणांची उपस्थिती लाभणार!
लोणखेडा येथील नारायणपूरम तीर्थ येथे अमृत भक्ती सत्संग महोत्सव

शहादा | ता.प्र.- SHAHADA

श्री नारायणभक्ती पंथाचे प्रवर्तक सद्गुरु श्री लोकेशानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणखेडा येथील श्री नारायणपुरम तीर्थ येथे दि.१८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान अमृत भक्ती सत्संग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, याच महोत्सवात २० नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व विविध मंत्रीगणांच्या उपस्थितीत श्रीनारायणपुरम तीर्थ मंदिर उभारणीचा शिलान्यास स्थापन करण्यात येणार आहे.

लोणखेडा येथील नारायणपूरम तीर्थ येथे अमृत भक्ती सत्संग महोत्सव
काटवनपाडा येथे वनविभागाकडून ३० हजाराचे सागवानी लाकूड जप्त

लोणखेडा (ता.शहादा) येथे श्री नारायण भक्ती पंथाच्या वतीने कॉलेजच्या पुढे भव्य दिव्य असे श्री नारायणपुरम तीर्थ मंदिराची निर्मिती आकारास येत आहे. त्यासाठी विविध धार्मिक उपक्रम घेतले जात आहेत. त्याच अनुषंगाने सद्गुरु श्रीलोकेशानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत भक्त सत्संग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणखेडा येथील नारायणपूरम तीर्थ येथे अमृत भक्ती सत्संग महोत्सव
घरकुल अनुदान घोटाळा : एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर दोन वेळा अनुदान वर्ग
लोणखेडा येथील नारायणपूरम तीर्थ येथे अमृत भक्ती सत्संग महोत्सव
तळोदा येथील वल्लभ सूर्यवंशी यांचा मरणोत्तर देहदानाचा संकल्प

दि.१८ ते २४ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान भक्ती सत्संग महोत्सव संपन्न होणार आहे. एक आठवडाभर चालणार्‍या या अमृत भक्ती सत्संग महोत्सवामुळे भाविकांना मोठी धार्मिक मेजवानी मिळणार आहे.

लोणखेडा येथील नारायणपूरम तीर्थ येथे अमृत भक्ती सत्संग महोत्सव
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

याच सत्संग महोत्सवादरम्यान दि.२० नोव्हेंबर रोजी श्रीश्री नारायणपुरम तीर्थ मंदिराच्या उभारणीसाठी प्रथम शिलान्यास स्थापन करण्याचा महोत्सवदेखील पार पडणार आहे. या महोत्सवासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा महाराष्ट्र व मध्यप्रदेशचे मंत्री गण आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लोणखेडा येथील नारायणपूरम तीर्थ येथे अमृत भक्ती सत्संग महोत्सव
Visual Story : भारतातीलच  नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर 'मिस वर्ल्ड'

या अमृत भक्ती सत्संग महोत्सवानिमित्त होणार्‍या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री नारायण भक्ती पंथाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com