नंदूरबार आगारातील सर्व एसटी कर्मचारी या तारखेपासून कामावर होणार हजर

बैठकीत सर्वानुमते निर्णय
नंदूरबार आगारातील सर्व एसटी कर्मचारी या तारखेपासून कामावर होणार हजर

नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar

मागील सहा महिन्यांपासून (ST staff) एसटी कर्मचारी विलीनीकरणसाठी आंदोलन सुरू होते. (High Court) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दि.22 एप्रिल २०२२ पासून कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

त्यानुसार नंदुरबार आगारातील सर्व एसटी कर्मचारी १८ एप्रिल पासून कामावर हजर होणार आहेत. याबाबत दि.14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) निमित्त (nandurbar) नंदुरबारात बैठक होऊन लढा विलीनीकरणसाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.

मागील सहा महिने झाले एसटी कर्मचारी बिनपगारी न्याय हक्कासाठी लढा देत होते. एसटी कर्मचारी विलीनीकरणासाठी आंदोलन सुरू होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नंदूरबार आगारातील सर्व एसटी कर्मचारी कामावर हजर होणार आहेत. याबाबत बैठकीत एक मताने निर्णय घेण्यात आला.

याबाबत कर्मचाऱ्यांच्या प्रति सहानुभूती म्हणून अल हैदरी चॅरिटेबल ट्रस्ट (Al Haidari Charitable Trust) कडून एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. २५०० रुपयांची किराणा किट अशा एकूण 72 किट या ट्रस्ट द्वारे वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाला डीवायएसपी सचिन हिरे, शहर (police) पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर उपस्थित होते.

ट्रस्टचे चेअरमन अध्यक्ष अय्याज अकबर व्होरा यांनी कीटचे वाटप केले. यावेळी ट्रस्टचे कुतुबुद्दीन गुलाम हुसेन, अशोकभाई सोमानी श्री.चौधरी कार्यक्रमास हजर होते.

यावेळी नंदुरबार आगरातर्फे लढा विलीनीकरण संघाचे अध्यक्षपदी ललित प्रदीप सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी दिलीप गायकवाड, विलास तांबोळी, आतील पठाण, सचिव रवींद्र बैरागी मंसूरी कार्याध्यक्ष सुनील पाटील, सचिन सूर्यवंशी, मुरली पगारे आदींची निवड करण्यात आली. याबाबतची माहिती नंदुरबार आगारातील रवींद्र पाटील यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.