काठी येथे मद्याची चोरटी वाहतूक

8 लाखांचा मुद्देमाल जप्त
काठी येथे मद्याची चोरटी वाहतूक

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) भरारी पथकाने (Bharari Pathaka) काठी (ता.अक्कलकुवा) येथे अवैधपणे परराज्यातील मद्याची वाहतूक (Alcohol transport) करणार्‍या महिंद्रा मॅक्ससह 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seizure of property) केला आहे.

काठी ते मोलगी रोड, मोलगी शिवार ता. अक्कलकुवा येथे महिंद्रा कंपनीची मॅक्स (क्र.एमएच 39-4030) याच्यात मद्याची वाहतक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या एकूण 5 हजार बाटल्या (100 बॉक्स) आढळून आल्या. तेथे वाहनासह जयसिंग अंतरसिंग पाडवी (वय 40, रा.काठी, ता.अक्कलकुवा) याला अटक करण्यात आली.

त्याच्याकडून वाहनासह 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1 9 4 9 अंतर्गत कलम 65 (अ) (ई), 80, 81, 83, 90, 98 (2), 108 अन्वये करण्यात आली. सदर कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.एम. चकोर, दुय्यम निरीक्षक एस.एस. रावते, पी.जे. मेहता, बी.एस.चोथवे, जवान राजेंद्र पावरा, हेमंत पाटील, हितेश जेठे, अविनाश पाटील, एम.एम.पाडवी, संदीप वाघ आदींनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस.एस. रावते करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com